२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 

दहा सामन्यांत फक्त ३ विजय पदरी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दमदार कामगिरी केली, पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:32 PM2024-05-04T22:32:16+5:302024-05-04T22:33:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi :  RCB 92 for 0 to 117 for 6, Josh Little take 4 crucial wickets, Video  | २५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 

२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : दहा सामन्यांत फक्त ३ विजय पदरी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दमदार कामगिरी केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात RCB ने विजय मिळवला आणि चौथ्या विजयासह प्ले ऑफच्या शर्यतीत अजूनही स्वतःला कायम राखले आहे. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी १४८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी ५.५ षटकांत ९२ धावा चोपल्या. आयपीएल इतिहासातील पॉवर प्लेमधील ही RCB ची सर्वोत्तम कामगिरी ठरली, पण GT च्या जॉश लिटलने ४ विकेट्स घेत RCB ची वाट लावली. 

विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video


नाणेफेक जिंकून RCB ने प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय योग्य़ ठरला. मोहम्मद सिराज ( २-२९), यश दयाल ( २-२१) यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. विराट कोहलीने एक भन्नाट रन आऊट करून सामन्याला कलाटणी दिली. विजयकुमार वैशाखने ( २-२३) २०व्या षटकात सलग ३ विकेट मिळवून दिल्या. त्यापैकी एक रन आऊट असल्याने त्याची हॅटट्रिक नाही झाली.  गुजरातचा संपूर्ण संघ १९.३ षटकांत १४७ धावांत तंबूत परतला. GT कडून मोहम्मद शाहरुख खान ( ३७), डेव्हिड मिलर ( ३०) व राहुल तेवाटिया ( ३५) यांनी चांगला खेळ केला.  


विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ५.५ षटकांत ९२ धावा चोपून विजय पक्का केला. विराटने सहावी धाव घेताच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १२५०० धावा पूर्ण केल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल ( १४५६२), शोएब मलिक ( १३३६०) व किरॉन पोलार्ड ( १२९००) हे विराटच्या पुढे आहेत. RCB ने पॉवर प्लेमध्ये १ बाद ९२ धावा केल्या आणि ही त्यांची पहिल्या सहा षटकांतील सर्वोत्तम कामगिरी ठरली . यापूर्वी २०११ मध्ये RCB ने पॉवर प्लेमध्ये ७९ धावा केल्या होत्या. जॉश लिटलने GT ला पहिले यश मिळवून दिले. फॅफ २३ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेला  विल जॅक्स ( १) नूर अहमदला विकेट देऊन परतला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला रजत पाटीदारही ( २) जॉश लिटलच्या आखूड चेंडूवर विकेट देऊन बसला. त्याच षटकात ग्लेन मॅक्सवेल ( ४) बाद झाल्याने RCB ची अवस्था बिनबाद ९२ वरून ४ बाद १०७ अशी झाली.  
RCB च्या पडझडचे सत्र १०व्या षटकातही कायम राहिले आणि लिटलने डावातील चौथी विकेट घेताना कॅमेरून ग्रीनला ( १) माघारी पाठवले. त्यात नूर अहमदने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. विराट २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतला आणि RCB ला ११७ धावांवर सहावा धक्का बसला.  


 

Web Title: IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi :  RCB 92 for 0 to 117 for 6, Josh Little take 4 crucial wickets, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.