१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 10:40 PM2024-05-08T22:40:32+5:302024-05-08T22:40:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, SRH vs LSG Live Marathi :  SRH BECOMES THE FIRST TEAM IN IPL HISTORY TO CHASE DOWN 160+ TOTAL INSIDE 10 OVERS, Abhishek Sharma and Travis Head break Sanath Jayasuriya's 16-year record for most Powerplay sixes by a batter in an IPL season | १६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम

१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. लखनौ सुपर जायंट्सच्या १६५ धावांचा SRH ने ९.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. आयपीएल इतिहासात १५० हून अधिक धावांचा १० षटकांच्या आत यशस्वी पाठलाग करणारा हैदराबाद हा पहिलाच संघ ठरला. त्यांनी ९.४ षटकांत एकही फलंदाज न गमावती ही मॅच जिंकली आणि गुणतालिकेत १४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. SRH च्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सची चौथ्या स्थानी घसरण झाली, तर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा संपुष्टात आल्या. 


SRH चा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पॉवर प्लेमध्ये ( ३-०-७-२) LSG ला जखडून ठेवले. नितिश कुमार रेड्डी व सनवीर सिंग यांनी दोन अविश्वसनीय झेल  घेतले. कृणाल पांड्या ( २४) व लोकेश राहुल ( २९) यांनी लखनौचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. निकोलस पूरन व आयुष बदोनी यांनी पाचव्या विकेटसाठी ५२ चेंडूंत ९९ धावा जोडून लखनौला ४ बाद १६५ धावांपर्यंत पोहोचवले.  बदोनी ३० चेंडूंत ९ चौकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला, तर पूरनने २६ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह नाबाद ४८ धावा केल्या. भुवीने ४ षटकांत १२ धावा देत २ विकेट्स घेतल्या.  LSGच्या पॉवर प्लेमधील २७ ( २ विकेट्स) धावा पाहता SRH ला १६६ धावा जड जातील असे वाटले होते


अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी  पॉवर प्लेमध्ये हैदराबादने १०७ धावा चढवल्या. आयपीएलमध्ये हैदराबादने दुसऱ्यांचा पॉवर प्लेमध्ये १००+ धावा केल्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच संघ ठरला. SRH ने ९.४ षटकांत बिनबाद १६७ धावा करून दणदणीत विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात १५० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दहा षटकांच्या आत करणारा हा पहिला संघ ठरला. अभिषेकने २८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ७५ धावा केल्या, तर हेडने ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या. २०१८ मध्ये नॉर्थहॅम्पटनशायरने १० षटकांत १६२ धावा ( वि. वॉर्सेस्टरशायर) चोपल्या होत्या. हा विक्रम आज हैदराबादने मोडला. त्यांनी ८.२ षटकांत केलेल्या १५० धावा या सर्वात जलद धावा ठरल्या. 


अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी सनथ जयसूर्याचा १६ वर्षांपूर्वीचा पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक षटकाराचा विक्रम मोडला. अभिषेक व ट्रॅव्हिस यांनी या आयपीएलमध्ये पॉवर प्लेमध्ये अनुक्रमे २४ व २३ षटकार खेचले. जयसूर्याने २००८मध्ये २२ आणि ख्रिस गेलने २०१५ मध्ये २१ षटकार खेचले होते.  
 

Web Title: IPL 2024, SRH vs LSG Live Marathi :  SRH BECOMES THE FIRST TEAM IN IPL HISTORY TO CHASE DOWN 160+ TOTAL INSIDE 10 OVERS, Abhishek Sharma and Travis Head break Sanath Jayasuriya's 16-year record for most Powerplay sixes by a batter in an IPL season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.