MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित

Mumbai Indians Playoff Scenario IPL 2025: यंदाच्या आयपीएलमधील मुंबईच्या मोहिमेचा अर्धा टप्पा पार झाला असून, आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये मुंबईने ३ विजय आणि ४ पराभवांसह ६ गुणांची कमाई केली आहे. याबरोबरच मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल का? प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी मुंबईला किती सामने जिंकावे लागलीत, याची आकडेमोड मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:15 IST2025-04-18T10:14:37+5:302025-04-18T10:15:50+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025: 7 matches, 3 wins and 6 points, how many matches will Mumbai Indians have to win to make it to the playoffs? This is the math | MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित

MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील सुरुवात तशी निराशाजनक झाली  आहे. मात्र मागच्या दोन लढतीत विजय मिळवत मुंबईने स्पर्धेत पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहे. गुरुवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादवर ४ गडी राखून मात केली होती. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील मुंबईच्या मोहिमेचा अर्धा टप्पा पार झाला असून, आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये मुंबईने ३ विजय आणि ४ पराभवांसह ६ गुणांची कमाई केली आहे. याबरोबरच मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल का? प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी मुंबईला किती सामने जिंकावे लागलीत, याची आकडेमोड मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किती लढती जिंकाव्या लागतील, याचा घेतलेला हा आढावा.

मुंबई इंडियन्सचा संघ हैदराबादवरील विजयानंतर सात सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांची कमाई करून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सचे आता स्पर्धेत ७ सामने उरले असून, या सात पैकी सातही सामन्यात विजय मिळवला तर मुंबईच्या खात्यामध्ये एकूण २० गुण जमा होतील. तसेच मुंबई इंडियन्स आयपीएलच्या प्लेऑफसाठी थेट पात्र ठरेल.

तसेच जर मुंबई इंडियन्सने पुढील सात सामन्यांपैकी ६ किंवा ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला तरी मुंबईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफसाठी पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचेल. मात्र मुंबईला केवळ ४ सामन्यांतच विजय मिळवता आला, तर मात्र मुंबईच्या खात्यात केवळ १४ गुण जमा होतील, तसेच संघाचं भवितव्य इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. मात्र आयपीएलमध्ये काही संघ १४ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरल्याची अनेक उदाहरणं आहेत, त्यामुळे त्या परिस्थितीतही मुंबईसाठी संधी असेल. गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने केवळ ७ सामन्यांत विजय मिळवून प्लेऑफ गाठण्यात यश मिळवलं होतं.

मात्र पुढच्या सात सामन्यांपैकी तीन किंवा त्यापेक्षा कमी लढतीत विजय मिळवल्यास मात्र मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. त्यामुळे मुंबईला प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी आता स्पर्धेच्या उत्तरार्धात अधिकाधिक कामगिरी उंचावून अधिकाधिक लढती जिंकाव्या लागतील. 

मुंबई इंडियन्सच्या पुढील लढतींचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे
२० एप्रिल - मुंबई इंजियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
२३ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद
२७ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स, मुंबई
१ मे- मुंबई इंडिन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, जयपूर
६ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजराज टायटन्स, मुंबई
११ मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, धर्मशाला
१५ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई  

Web Title: IPL 2025: 7 matches, 3 wins and 6 points, how many matches will Mumbai Indians have to win to make it to the playoffs? This is the math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.