चेन्नईकडून आयपीएलमध्ये डेब्यू करणारा १७ वर्षीय आयुष म्हात्रेने वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करून सर्व चाहत्यांची मने जिंकली. आयुष म्हात्रेने अवघ्या २५ चेंडूत ३२ धावा केल्या. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. याचदरम्यान,आयुष म्हात्रेचा लहानपणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो ११ वर्षे जुना आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आयुष म्हात्रे अवघ्या सहा वर्षांचा आहे. आयुष म्हात्रे यांना काही प्रश्न विचारले जात आहेत, त्या प्रश्नांचे उत्तरे तो एका शब्दात देत आहे. त्यानंतर आयुष म्हात्रेच्या आजोबांनी काही प्रश्नाची उत्तरे दिली, जे त्यांच्या नातावाला मुंबईच्या मैदानावर खेळायला घेऊन जायचे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी
आयुष म्हात्रेने गेल्या वर्षी इराणी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाकडून पदार्पण केले. इराणी ट्रॉफीमध्ये त्याने पहिला सामना रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध खेळला. त्याने मुंबई संघासाठी एकूण ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात दोन शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. याशिवाय, आयुष म्हात्रेने ७ लिस्ट-ए सामने खेळले आहेत, ज्यात त्याने दोन शतके आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ४५८ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या उर्वरित सामन्यांमध्ये आयुष म्हात्रेकडून चांगली कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
पदार्पणाच्या सामन्यात इतिहासात नोंद
आयपीएलच्या डेब्यू सामन्यातच आयुष म्हात्रेच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला. तो चेन्नईकडून खेळणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. आयुष म्हात्रेचे वय १७ वर्षे २७८ दिवशी आपला पहिला आयपीएल सामना खेळला आहे. चेन्नईकडून खेळणाऱ्या युवा फलंदाजाच्या यादीत अभिनव मुकुंद दुसऱ्या क्रमाकावर आहे. त्याने वयाच्या १८ वर्षे १३९ दिवशी चेन्नईकडून पहिला सामना खेळला. त्यानंतर यादीत अंकित राजपूत (१९ वर्षे १२३ दिवस), मिथिशा पाथिराना (१९ वर्षे १४८ दिवस) आणि नूर अहमद (२० वर्षे ७९ दिवस) अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे.
Web Title: IPL 2025: CSK Debutant Ayush Mhatre Throwback Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.