IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'

CSK च्या संघानं दिलेल्या १०४ धावांचा पाठलाग करताना KKR च्या संघाने ६१ चेंडूतच मॅच संपवली. कोलकाताच्या संघाने ८ गडी आणि ५९ चेंडू राखून दमदार विजय नोंदवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 01:12 IST2025-04-12T01:11:03+5:302025-04-12T01:12:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 CSK vs KKR Ajinkya Rahane has called former CSK stars as masterminds in KKR's historic win over CSK at Chepauk | IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'

IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाताच्या संघानं चेपॉकचं मैदान मारत आपल्या खात्यात दोन गुण जमा केले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना केकेआरच्या संघानं कमालीची गोलंदाजी करत पहिल्या षटकापासून सामन्यावर मिळवलेली मजबूत पकड शेवटपर्यंत कायम राखली अन् चेन्नईच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले. CSK च्या संघानं दिलेल्या १०४ धावांचा पाठलाग करताना KKR च्या संघाने ६१ चेंडूतच मॅच संपवली. कोलकाताच्या संघाने ८ गडी आणि ५९ चेंडू राखून दमदार विजय नोंदवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आधी आम्ही २ गुणांचा विचार केला, पण सहाव्या षटकात आम्ही ठरवलं की..

दमदार विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी या मैदानात खेळलोय. मोईल अलीला या मैदानात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. एवढेच नाही तर ब्राबोही आमच्यासोबत आहे. इथल्या परिस्थितीनुसार आम्ही रणनिती आखून मैदानात उतरलो होतो, असे सांगत अजिंक्यनं CSK तून खेळणाऱ्या गड्यांच्या जोरावर मैदान मारणं सोपे झाल्याचे म्हटले आहे. अजिंक्यसह ही मंडळी आधी CSK च्या ताफ्यात होती. आधी आम्ही फक्त २ गुणांचा विचार करत होतो, पण  सहाव्या षटकात आम्ही मॅच लवकर संपवायचं असं ठरवलं. संघाच्या सकारात्मक अप्रोचमुळे आनंदी आहे, असेही तो म्हणाला. 

CSKचे कर्णधारपद मिळताच MS Dhoni जुन्या सहकाऱ्याला म्हणाला- 'गद्दार'; तो खेळाडू कोण?

आजच नव्हे यंदाच्या हंगामात अनेकदा असं झालं! नेमकं काय म्हणाला धोनी? 

चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानातील पराभवानंतर धोनीने संघ सातत्याने अपयशी ठरतोय, हे मान्य केले. आजचा सामनाच नव्हे तर यंदाच्या हंगामात अनेकदा गोष्टी आमच्या विरोधात गेल्या. आमच्यासाठी ही आत्मपरिक्षणाची वेळ आहे. काय चुकतंय हे बघून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आव्हान मोठे होते. पण ते परतवून लावण्यासाठी  धावफलकावर धावा लावणे गरजेचे होते. ठराविक अंतराने विकेट गमाल्यामुळे गोष्टी आणखी अवघड झाल्या. कुणालाच भागीदारी करता आली नाही. याचा फटका आम्हाला बसला, असे म्हणत त्याने पटरीवर येण्यासाठी कामगिरीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

Web Title: IPL 2025 CSK vs KKR Ajinkya Rahane has called former CSK stars as masterminds in KKR's historic win over CSK at Chepauk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.