आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं

DC नं 'सब ठीक है भाई..' म्हणत शेअर केला खास व्हिडिओ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:36 IST2025-04-15T18:26:59+5:302025-04-15T18:36:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Karun Nair Jasprit Bumrah Hug It Out After Heated Faceoff During DC vs MI Clash Watch Viral Video | आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं

आधी २४ यार्ड्समधील 'दुश्मनी'चं प्रकरण गाजलं; आता रिलीज झालं बुमराह-नायर यांच्यातील 'दोस्ती'चं गाणं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 Karun Nair vs Jasprit Bumrah : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध  मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अगदी रंगतदार झाला. या सामन्यात शेवटी मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारली. या सामन्यावेळी  २४ यार्ड्समधील जागेवरून जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांच्यात वाद रंगल्याचेही पाहायला मिळाले. बुमराह-नायर यांची खेळपट्टीवर एकमेकांसोबत झालेली टक्कर अन् जसप्रीत बुमराहनं दमदार कमबॅक करणाऱ्या करुण नायरवर काढलेला राग चांगलाच चर्चेचा विषय ठरला. हे प्रकरण गाजल्यावर आता दोघांमध्ये 'दोस्ती' वाजलेले गाणं चर्चेत आले आहे.  दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दोघांचा  एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

DC नं 'सब ठीक है भाई..' म्हणत शेअर केला खास व्हिडिओ  

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने 'सब ठीक है भाई।' या खास कॅप्शनसह अधिकृत एक्स अकाउंटवरुन जसप्रीत बुमराह आणि करुण नायर यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ दोन्ही खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन केल्यावर गळाभेट घेताना दिसून येते. दोघांच्यात काहीतरी संवादही झाल्याचे दिसते.  मैदानात जे घडलं ते तिथंच संपलं. त्या गोष्टीचा राग  ना बुमराहच्या मनात आहे ना करुण नायरच्या या सीनसह दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने  दोघांच्यात ऑल इज वेल सीनची झलक दाखवली आहे. 

IPL 2025 : बुमराह-नायर टक्कर! मग मैदानात रंगला ड्रामा; रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन चर्चेत

करुण नायर-जसप्रीत बुमरा यांच्यातील सामना
 
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात करूण नायरला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना त्याने कडक बॅटिंग केली. बुमराहविरुद्ध त्याने ज्या अंदाजात फलंदाजी केली ते पाहण्याजोगे होते. पॉवर प्लेमधील अखेरच्या षटकात बुमराहच्या षटकात त्याने १८ धावा कुटल्या. दुहेरी धाव घेत २२ चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले. अर्धशतक पूर्ण करताना दोन धावा काढताना त्याची आणि बुमराहची टक्कर झाली. यावेळी बुमराहने मी माझ्या जागेवर उभा असून तूच माझ्या दिशेने आला आहेस, असे म्हणत त्याच्यावर राग काढला होता. ड्रिंक्स ब्रेमध्येही दोघांच्यात शाब्दिक चकमक सुरु असल्याचे दिसून आले. पण मॅच संपली अन् तो विषयही क्लोज झालाय. दिल्ली कॅपिटल्सनं व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा पुरावाच दिल्याचे दिसते. 

Web Title: IPL 2025 Karun Nair Jasprit Bumrah Hug It Out After Heated Faceoff During DC vs MI Clash Watch Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.