IPL 2025: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला (Video)

KL Rahul Sanjiv Goenka Viral Video, IPL 2025 LSG vs DC: केएल राहुल - संजीव गोयंका यांच्यात गेल्या वर्षी नेमकं काय घडलं होतं... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:13 IST2025-04-24T14:10:17+5:302025-04-24T14:13:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs DC Viral Video KL Rahul ignores Sanjiv Goenka fans say revenge of insult | IPL 2025: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला (Video)

IPL 2025: अच्छा... ओके... बाय..! केएल राहुलने घेतला संजीव गोयंकांनी केलेल्या अपमानाचा बदला (Video)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KL Rahul Sanjiv Goenka Viral Video, IPL 2025 LSG vs DC: आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्लीने लखनौवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. सामन्यात लोकेश राहुलने ४२ चेंडूत ५७ धावांची खेळी करीत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. यावेळी लखनौचे मालक संजीव गोयंका राहुलशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आले. मात्र, राहुलने गोयंकांशी बोलण्यात उत्सुकता दाखवली नाही. तो हात मिळवून लगेच पुढे निघून गेला.

गोयंका यांनी राहुलशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली. काहींनी राहुलच्या या कृतीचे समर्थन केले, तर काहींनी याचा संबंध थेट गेल्या वर्षीच्या घटनेशी जोडला.

लोकेश राहुलसोबत नेमके काय घडले होते?

गेल्या वर्षी राहूल लखनौचा कर्णधार होता, एका पराभवानंतर गोयंका यांनी थेट मैदानावरच राहुलशी वाद घातला. त्यावेळी राहुलने शांत राहणे पसंत केले. तो व्हिडिओदेखील प्रचंड व्हायरल झाला होता. यंदा दिल्लीकडून खेळताना राहुलने खेळीतून आणि कृतीतून गोयंकांना 3 अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. राहुलने मिडविकेटवर प्रिन्स यादवच्या चेंडूवर मारलेला विजयी षटकार गोयंका जेथे बसले होते त्या पॅव्हेलियनच्या अगदी खाली पडला, हा देखील एक योगायोग असल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

राहुल-पोरेल यांची दमदार अर्धशतके

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला धोबीपछाड दिला. लखनौच्या संघाने दिलेल्या १६० धावसंख्येचा पाठलाग करताना १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केएल राहुलनं षटकार मारत अगदी दिमाखात संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघाने एडन मार्करमचे अर्धशतक आणि मिचेल मार्श आणि आयुष बडोनी यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह अभिषेक पोरेलने अर्धशतक झळकावले.

Web Title: IPL 2025 LSG vs DC Viral Video KL Rahul ignores Sanjiv Goenka fans say revenge of insult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.