IPL 2025 LSG vs GT 26th Match : निकोलस पूरन ६१ (३४) आणि एडन मार्करम ५८ (३१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २६ व्या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सनं घरच्या मैदानावर गुजरात जाएंट्सला पराभूत केले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सच्या संघानं शुबमन गिल ६० (३८) आणि साई सुदर्शन ५६ (३७) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १८० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौच्या संघानं ६ विकेट्स राखून विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुबमन गिल अन् साई सुदर्शन सलामी जोडीची ७३ चेंडूत १२० धावांची भागीदारी, पण...
पहिल्यांदा फलंदाजी करताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीनं पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी रचली होती. यंदाच्या हंगामात सलामी जोडीनं केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. या जोडीनं ७३ चेंडूत १२० धावा केल्या होत्या. ही दोघे तंबूत परतल्यावर गुजरात टायटन्स संघाची गणित बिघडले. उर्वरित ४७ चेंडूत संघाने फक्त ६० धावा केल्या. १२ व्या षटकानंतर लखनौच्या गोलंदाजांनी सामन्यात नवा ट्विस्ट आणत जो संघ २०० पार धावंसख्या सहज उभारेल, असे वाटत होते. त्यांना १८० धावांवर रोखले. लखनौकडून रवी बिश्नोई आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय आवेश खान आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला
लखनौचा सलामीचा प्रयोग फसला, पंत स्वस्तात तंबूत
मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत कर्णधार रिषभ पंतनं मार्करमच्या साथीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर ६५ धावा असताना रिषभ पंत १८ चेंडूत २१ धावा करून तंबूत परतला. सलामीचा हा प्रयोग तसा फसलाच. पण एडन मार्करम आणि निकोल पूरन या दोघांच्या धमाकेदार खेळीमुळे लखनौला याचा फारसा त्रास झाला नाही.
निकोलस पूरनची वादळी खेळी, मार्करमचं अर्धशतक अन् बडोनीनं सिक्सर मारत संपवली मॅच
धावांचा पाठलाग करताना मार्करमनं ३१ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. निकोलस पूरन याने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील तडाखेबाज फटकेबाजी दाखवून दिली. त्याने ३४ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ६१ धावा करत सामना सेट केला. आयुष बडोनी याने अखेरच्याषटकात षटकार मारत मॅच संपवली. त्याने २० चेंडूत नाबाद २८ धावांची खेळी केली.
Web Title: IPL 2025 LSG vs GT Aiden Markram Nicholas Pooran Fifty Lucknow Super Giants Won By 6 Wkts Against Gujarat Titans After Sai Sudharsan Shubman Gill 120 Runs Partnership Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.