Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

लखनौ विरुद्धच्या सामन्यात पांड्याची हवा; अर्धा संघ तंबूत धाडत सेट केला नवा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:38 IST2025-04-04T21:35:56+5:302025-04-04T21:38:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs MI Hardik Pandya Set Record First Captain To Take Five Wicket Haul In IPL History | Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

Hardik Pandya Record : पांड्यानं रचला इतिहास; IPL च्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs MI Hardik Pandya Set Record With Five Wicket Haul :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात कमालीची गोलंदाजी करत नवा इतिहास रचला आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने पंतसह पाच गडी बाद करत पाच विकेट्सचा डाव साधला. या कामगिरीसह त्याने आयपीएलमध्ये नवा रेकॉर्ड सेट केला आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पाच विकेट्स घेणारा तो पहिला कर्णधार ठरलाय. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात अन्य कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

हार्दिक पांड्यानं साधला मोठा डावा, असा पराक्रम करणारा ठरला पहिला कॅप्टन

हार्दिक पांड्याने पहिल्या तीन षटकात निकोलस पूरन, रिषभ पंत आणि एडन मार्कम यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून अखेरचे षटक टाकण्यासाठी आल्यावर तो हॅटट्रिकवरही पोचला होता. आपल्या वैयक्तिक चौथ्या आणि लखनौच्या डावातील अखेरच्या षटकात पांड्यानं डेविड मिलर आणि आकाश दीप यांची विकेट घेत पाच विकेट्स पूर्ण केल्या.  

LSG vs MI : महागडा पंत पुन्हा स्वस्तात तंबूत परतला; संघ मालक संजीव गोएंका यांची रिअ‍ॅक्शन चर्चेत

हार्दिक पांड्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

लखनौ विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्यानं आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वात्तम कामगिरीची देखील नोंद केली आहे. याआधी न्यूझीलंड विरुद्ध अहमदाबादच्या मैदानात १६ धावा खर्च करत त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही आकडेवारी सुधारत  आयपीएलमध्ये त्याने ३५ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा कॅप्टन

आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करताना सर्वाधिक विकेट्स आपल्या खात्यात जमा करण्याचा रेकॉर्ड हा शेन वॉर्नच्या नावे आहे. त्याने आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करताना ५७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या पाठोपाठ हार्दिक पांड्या या यादीत ३० विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळेच्या ३० विकेट्सच्या रेकॉर्डची पांड्याने बरोबरी केलीये. 

Web Title: IPL 2025 LSG vs MI Hardik Pandya Set Record First Captain To Take Five Wicket Haul In IPL History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.