Rishabh Pant Delhi Capitals Retention, IPL 2025 Mega Auction: यंदाच्या IPL लिलावात सर्वाधिक चर्चा होत आहेत ती म्हणजे रिषभ पंतच्या बोलीची. पंतला दिल्लीने करारमुक्त केले. त्यानंतर पंत आणि दिल्लीत काय बिनसलं याबद्दल दोघांपैकी कुणीही काहीही अधिकृत बोलले नव्हते. पण आता रिषभ पंतनेदिल्ली कॅपिटल्स पासून वेगळे होण्याबाबत मौन सोडले आहे. त्याने एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, मी पैशासाठी हा आयपीएल संघ सोडलेला नाही.
पंतने स्टार स्पोर्ट्सच्या एका व्हिडिओला रिप्लाय देत असताना आपली बाजू मांडली आहे. एका व्हिडीओमध्ये महान फलंदाज आणि समालेचक सुनील गावस्कर हे IPL 2025 मेगा लिलावावर चर्चा करत होते. त्यावेळी दिल्लीने त्यांचा कर्णधार पंतला संघात कायम न ठेवण्याबद्दल त्यांनी काही कारणे सांगितले. त्यावेळी पंतने रिप्लाय देत आपली बाजू मांडली.
व्हिडिओमध्ये सुनील गावसकर म्हणाले की, मला विश्वास आहे की दिल्ली कॅपिटल्स आणि रिषभ पंत यांच्यात मानधनाबाबत मतभेद असू शकतात. २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मेगा लिलावात कॅपिटल्सचा संघ पंतवर बोली लावून त्याला पुन्हा संघात घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असेही गावस्कर यावेळी म्हणाले. या व्हिडिओवर पंतने प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की त्याने पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स संघ सोडला नाही. पंतने या पोस्टमध्ये लिहिले की, मी निश्चितपणे म्हणू शकतो की माझे संघात रिटेन न करण्याचे कारण पैसे किंवा मानधन हे नव्हते.
व्हिडिओमध्ये गावसकर पंतबद्दल काय म्हणाले?
गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला वाटते दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या संघात रिषभ पंत परत हवा आहे. काहीवेळा, जेव्हा एखाद्या खेळाडूला कायम ठेवावे लागते तेव्हा अपेक्षित शुल्काची फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यात वाटाघाटी केल्या जातात. काही खेळाडू त्यांच्या फ्रँचायझींनी कायम ठेवले तरी त्यांना अव्वल क्रमांकाची फी किंवा मानधन दिले जात नाही. त्यामुळे साहजिकच मला वाटते की त्यांचे याच मुद्द्यावर काही मतभेद असू शकतात. परंतु मला वाटते की दिल्लीला ऋषभ पंत परत हवा आहे.
दरम्यान, दिल्ली संघाने अक्षर पटेल (१६.५० कोटी), कुलदीप यादव (१३.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्स (१० कोटी) आणि अभिषेक पोरेल (४ कोटी) यांना संघात कायम ठेवले आहे.
Web Title: IPL 2025 Mega Auction Rishabh Pant slams Sunil Gavaskar claims of Delhi Capitals saying My retention was not about the money for sure that I can say
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.