MS Dhoni On Chennai Super Kings Playoffs Hopes And More : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची अवस्था खूपच बिकट आहे. त्यात आता मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवाची भर पडलीये. तळाला असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ यंदाच्या हंगामात टिकेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचं काय होणार? हा प्रश्न चर्चेत आला असताना महेंद्रसिंह धोनीने प्लेऑफ्ससह त्याच्या पलीकडची गोष्ट बोलून दाखवली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर तो प्लेऑफ्सची संधी अन् बरेच काही बोलून गेला. जाणून घेऊयात नेमकं तो काय म्हणाला यासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीनं सांगितलं पराभवामागचं कारण
वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मधल्या षटकांत धावा झाल्या नाहीत. तिथेच आम्ही मागे पडलो. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर दबावात टाकत मोठी धावसंख्या निर्माण करण्याची आमच्याकडे संधी होती. पण त्याचा फायदा उठवता आला नाही. हेच पराभवाचे कारण ठरले, असे धोनीने सामन्यानंतर म्हटले आहे. यावेळी त्याने प्लेऑप्ससंदर्भातील समीकरण आणि भविष्यातील प्लॅनिंगसंदर्भात देखील भाष्य केले.
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
प्रत्येक सामना महत्त्वाचा, पण..
आता आमच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी प्रयत्न करणे एवढेच आता आमच्या हातात आहे. एका वेळी एका सामन्याचा विचार करून योग्य रणनितीसह मैदानात उतरु. पण जर पराभवाचा सामना करावा लागला तर पुढच्या हंगामाच्या दृष्टीने योग्य संघबांधणीचा विचारही करणे गरजेचे आहे. संघात अधिक बदल न करता संतुलित संघ तयार करण्यावर भर दिला जाईल. जेणेकरून पुढच्या हंगामात कमबॅक करणे सोपे होईल, अशा आशयाच्या शब्दांत त्याने प्लेऑफ्ससह पुढचा प्लॅन सांगून टाकला आहे.
स्पर्धेत टिकण्याचे मोठं चॅलेंज
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. जर त्यांना प्लेऑफ्ससाठी पात्र ठरायचे असेल तर आता सर्वच्या सर्व ६ सामने जिंकावे लागणार आहेत. एखादा सामना गमावला तर ५ सामन्यातील विजयासह चेन्नईचा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. पण या परिस्थितीत दुसऱ्या संघाच्या निकालावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते. चेन्नई सुपर किंग्जची यंदाच्या हंगामातील कामगिरी पाहता त्यांच्यासमोरी आव्हान खूपच कठीण असल्याचे दिसते.
Web Title: IPL 2025 MI vs CSK MS Dhoni On Chennai Super Kings Playoffs Hopes And Planning For IPL 2026 Comeback Strong
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.