पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या हंगामातील ३१ वा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगल्याचे पाहायला मिळाले. घरच्या मैदानात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा श्रेयस अय्यरचा निर्णय फसला. पंजाबची आघाडीची फलंदाजी कोलमडल्यावर विकेट्सची अक्षरश: रांग लागली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन स्टार ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. वरुण चक्रवर्तीनं त्याला आपल्या जादुई फिरकीवर चकवा दिला. चेंडूचा टप्पा कुठं पडला अन् त्रिफळा कधी उडला हे त्याला कळलंही नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ग्लेन मॅक्सवेलचा आणखी एक फ्लॉप शो!
या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं आपल्या फिरकीची जादू दाखवून देताना आधी जोश इंग्लिसला बाद केले. त्यानंतर त्याने ग्लेन मॅक्सवेललाही गंडवले. १० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने कॅरम बॉल टाकला जो ग्लेन मॅक्सवेलला अजिबात कळला नाही. तो १० चेंडूत अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला. त्याचा सातत्याने सुरु असलेला फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ट्रोल होताना दिसतोय.
PBKS vs KKR : जुन्या संघावर राग काढायचं सोडा एक धाव नाही काढली; श्रेयसच्या पदरी पडला सातवा भोपळा!
यंदाच्या हंगामातच नव्हे तर गत हंगामापासून सुरुये हा सिलसिला
२०२४ च्या हंगामापासून आतापर्यंत १४ डावांमध्ये ग्लेन मॅक्सवेल याने फक्त ९३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरीही ६.६४ इतकी आहे. ५ वेळा त्याच्यावर शून्यावर तंबूत परतण्याची वेळ आली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही त्याच्याच नावे आहे.
प्रीतीनं भरवसा ठेवला, पण..
आयपीएलच्या गत हंगामात ग्लेन मॅक्सवेल हा ११ कोटींच्या पॅकेजसह आरसीबीच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. या हंगामात १० सामन्यात त्याने फक्त 52 धावा केल्या होत्या. खराब कामगिरीमुळे RCB च्या संघाने त्याला रिलीज केले. प्रीतीच्या पंजाबने मेगा लिलावात ४.२० कोटी रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. प्रीतीनं त्याच्यावर भरवसा दाखवला. पण तो बिन कामाचाच ठरताना दिसते.
बिग फ्रॉडसह उमटल्या IPL मधून बंदी घालण्यासंदर्भातील प्रतिक्रिया
IPL2025
ग्लेन मॅक्सवेलचा सातत्यपूर्ण फ्लॉप शोनंतर त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर काहीजण त्याला IPL मधून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला देताना दिसते. एवढेच नाही तर काहींना तर हा खेळाडू म्हणजे IPL मधील बिग फ्रॉड असल्याचे म्हटले आहे. त्याच्यावर आयपीएलमध्ये बंदी घालायला हवी, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटल्याचे दिसून येते.
Web Title: IPL 2025 PBKS vs KKR Glenn Maxwell bamboozled by Varun Chakravarthy's peach Fans Demand His IPL Ban See His Poor Record Last 14 Innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.