IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

१११ धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ शंभरीच्या आत ऑल आउट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 22:49 IST2025-04-15T22:44:05+5:302025-04-15T22:49:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs KKR Yuzvendra Chahal Chahal Shines As Punjab Kings Script History By Defending 111 vs Kolkata Knight Riders | IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Punjab Kings vs Kolkata Knight Riders, 31st Match : घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना फसलेल्या पंजाब किंग्ज संघाने अल्प धावसंख्येचा बचाव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.  पंजाब किंग्जच्या संघाने १११ धावा करत कोलकता नाईट रायडर्ससमोर ११२ धावांचे टार्गेट सेट केले होते. ही धावसंख्या कोलकाताचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते. पण युजवेंद्र चहलनं घेतलेल्या ४ विकेट्स अन् त्याला यान्सेनसह अन्य गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर  पंजाबने कोलकाताला  ९५ धावांवर रोखत हा सामान जिंकून दाखवला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्याचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे असलेल्या  पंजाब किंग्जच्या संघाने आता सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करून दाखवत नवा इतिहास रचला आहे. कमालीचा योगायोग म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करताना पंजाबने कोलकाताच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत केले होते. आता अल्प धावसंख्येचा बचाव करताना घरच्या मैदानात त्यांनी कोलकाता संघालाच पराभूत केले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 सलामी जोडी स्वस्तात आटोपल्यावर अजिंक्यनं सावरला डाव, पण..

अल्प धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातच खराब झाली. मार्को यान्सेन याने पहिल्याच षटकात सुनील नरेन याला बोल्ड केले. चौथ्या षटकात झेवियर बार्टलेट याने क्विंटन डिकॉकला तंबूचा रस्ता दाखवत कडवी फाइट देण्याचे संकेत दिले. कोलकाताच्या संघाने अवघ्या ७ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अंगकृष्ण रघुवंशी याने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.पण त्याची विकेट पडली अन् कोलकाताचा संघ अडचणीत आला.

PBKS vs KKR : हा तर IPL मधील बिग फ्रॉड! वरुण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसल्यावर ग्लेन मॅक्सवेल ट्रोल

...अन् पिक्चरमध्ये आला चहल

मग चहल पिक्चरमध्ये आला. चहलनं अजिंक्य राहणेला पायचित करत ६२ धावांवर कोलकाता संघाला तिसरा धक्का दिला.  त्यानंतर दहाव्या  षटकात चहलनं अंगकृष्ण रघुवंशीची विकेट घेत कोलकाताला आणखी बॅकफुटवर ढकलले.. बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरलेल्या मॅक्सवेलनं व्यंकटेश अय्यरची विकेट घेत सामन्यात आणखी ट्विस्ट आणले. कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील १२ व्या षटकात  रिंकू सिंह आणि रमणदीप सिंग यांना बॅक टू बॅक तंबूत धाडत चहल हॅटट्रिकवर पोहचला. हा डाव त्याला साधता आला नाही. पण ७७ धावांवर ७ विकेट्स अशी अवस्था करत त्याने कोलकाता संघाला अडचणीत आणले. 

रसेलनं मसल पॉवर दाखवली, पण शेवटी तो फसला अन् केकेआरच्या पदरी पडला पराभव 

१२ व्या षटकानंतर   कोलकाता नाईट रायडर्सला ३५ धावांची आवश्यकता असताना ३ विकेट्स त्यांच्या हातात होत्या. श्रेयस अय्यरनं १३ व्या षटकात मार्को यान्सेनच्या हाती चेंडू सोपवला. त्याने हर्षित राणाची विकेट घेत पंजाबचा विजयाच्या आशा आणखी पल्लवित केल्या. १४ व्या षटकात चहल आपले अखेरचे षटक घेऊन आला. या षटकात आंद्रे रसेलनं आपली मसल पॉवर दाखवली. २ षटकारासह १ चौकार मारत रसेलनं १६ धावा कुटत विजयासाठी आवश्यक धावांचे अतंर कमी केले. पण १५ व्या षटकात स्ट्राइक वैभव आरोराकडे गेले. त्याने अर्शदीपचे हे षटक उत्तमरित्या खेळून काढले.पण शेवटच्या चेंडूवर तो फसला आणि पंजाब विजयाच्या आणखी जवळ गेला. १६ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यान्सेन याने रसेलला बोल्ड केले अन् पंजाबनं सामना आपल्या नावे केला.
 

Web Title: IPL 2025 PBKS vs KKR Yuzvendra Chahal Chahal Shines As Punjab Kings Script History By Defending 111 vs Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.