IPL 2025 Player Retention : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी होणाऱ्या रिटेन-रिलीजच्या खेळात अनेक युवा खेळाडूंना मोठी लॉटरी लागणार आहे. लाख मोलाच्या गंड्याचा भाव थेट कोट्यवधीत गेल्याचे पाहायला मिळेल. आयपीएलमधील तगड्या पॅकेजसह हे खेळाडू खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करताना दिसू शकते. एक नजर टाकुयात अशा कॅप्ड अन् अनकॅप्ड खेळाडूंवर जे आतापर्यंत लाखात खेळायचे पण रिटेन झाल्यावर ते कोट्यधीश होतील अशा खेळाडूंवर
रिंकू सिंह (Rinku Singh)
रिंकू सिंह (Rinku Singh) हा आयपीएलमधील स्टार खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन करण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. एका ओव्हरमध्ये सामन्याला कलाटणीदेण्याची क्षमता असणाऱ्या या खेळाडूला कोलकात आपल्या ताफ्यातून सोडणारनाही. रिटेन करताना त्याचा भावही चांगलाच मिळेल, यात शंका नाही. रिंकू सिंहला ११ कोटीसह रिटेन केले जाऊ शकते. याआधी त्याला KKR कडून ५५ लाख रुपये मिळत होते. कोलकातानं त्याला रिटेन केल्यावर तो करोडपतीच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल.
मयंक यादव (Mayank Yadav)
मयंक यादव (Mayank Yadav)आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लखनऊ त्याला आपल्या ताफ्यात कामय ठेवण्यास उत्सुक असेल. रिटेन-रिलीजचा खेळ रंगण्याआधी या भिडूनं टीम इंडियात अगदी दाबात एन्ट्री केली होती. बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतून २२ वर्षीय गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे तो आता कॅप्ड प्लेयरच्या यादीत आहे. २० लाखात खेळणारा हा गडी आगामी हंगामात कोट्याधीशांच्या यादीत दिसला तर नवल वाटणार नाही.
मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana)
श्रीलंकेचा २१ वर्षीय गोलंदाज मथिशा पाथिराना (Matheesha Pathirana) मागील ३ वर्षांपासून चेन्नई सुपर किग्सचा भाग आहे. आगामी आयपीएलसाठी चेन्नईचा संघ त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवणार यात कोणतीही शंका नाही. हा खेळाडू चेन्नईचा तिसऱ्या क्रमांकासाठी रिटेन होणारा खेळाडू ठरू शकतो. त्यामुळे त्याला ११ कोटी मिळतील, अशी अपेक्षा आहे. मागच्या दोन्ही हंगामात तो २० लाख या मूळ किंमतीसह चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात होता. यावेळी त्याच्यासाठी CSK मोठी रक्कम मोजायला तयार होईल, असे वाटते.
आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma )
पंजाब किंग्सच्या संघाने आयपीएल २०२४ च्या हंगामात आशुतोष शर्माला (Ashutosh Sharma ) २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं होते. या युवा गड्यानं अफलातून कामगिरीसह सर्वांचं लक्षवेधून घेतलं. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतून पंजाबचा संघ या भिडूवर ४ कोटींचा डाव खेळू शकतो.
शशांक सिंह (Shashank Singh)
आयपीएल २०२४ च्या हंगामात शशांक सिंह (Shashank Singh) हा देखील पंजाब किंग्सचा तगडा मोहरा होऊन समोर आला होता. आगामी हंगामासाठी अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीतून पंजाबचा संघ या खेळाडूसाठीही ४ कोटी रुपये खर्च करताना पाहायला मिळू शकते. गत हंगामात तो २० लाखात पंजाबकडून खेळताना दिसले होते.
हर्षित राणा (Harshit Rana)
हर्षित राणानं (Harshit Rana) आयपीएलमधील दमदार कामगिरीसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप सोडत टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. प्लेइंग इलेव्हनचा भाग न झाल्यामुळे त्याला केकेआरचा संघ अनकॅप्ड खेळाडूच्या यादीतूनच रिटेन करेल. नव्या नियमानुसार त्याची सॅलरी ४ कोटींच्या घरात पोहचेल. गत हंगामात केकेआरच्या संघाने या खेळाडूसाठी २० लाख ही मूळ किंमत मोजली होती.
Web Title: IPL 2025 Player Retention Rinku Singh Harshit Rana Mayank Yadav Shashank Singh Matheesha Pathirana Will Be Retained On Crores Ahead Of IPL 2025 Mega Auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.