IPL 2025 Preity Zinta Hugs Yuzvendra Chahal After PBKS's Wins : पंजाब न्यू क्रिकेट असोसिएशनच्या चंदीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाबच्या संघानं नवा इतिहास रचला. सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करताना कोलकाताच्या संघाला शंभरीच्या आत गुंडाळत पंजाबच्या संघाने २४ धावांनी सामना जिंकला. या विजयात युजवेंद्र चहलनं मोलाचा वाटा उचलला. पंजाबचा डाव संपला त्यावेळी पंजाबी चाहत्यांसह सह स्टँडमध्ये उपस्थितीत असलेल्या सह संघ मालकीण प्रीती झिंटाचाही चेहरा पडला होता. यामागचं कारण हा सामना पंजाब जिंकण्याची तशी शक्यता खूपच कमी वाटत होती. पण चहलच्या फिरकीची जादू अन् त्याला अन्य गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या जोरावर पंजाबने सामना जिंकला. शाहरुख खानच्या संघासमोर पंजाब किंग्जनं ब्लॉकबस्टर शो दिला. या विजयानंतर प्रीती झिंटाला झालेला आनंद बघण्याजोगा होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चहलनं फिरवली मॅच, अजिंक्य रहाणेची विकेट ठरली टर्निंग पॉइंट
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धमी सुरुवात करणाऱ्या चहलनं आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देताना ४ षटकात २८ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. अजिंक्यच्या रुपात पहिली विकेट घेतली तो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. या विकेटनंतर कोलकातांच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. पहिल्या तीन षटकातच चहलनं ४ विकेट्स घेत सामना पंजाबच्या बाजूनं वळवल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास
मार्को यान्सेन याने रसेलला बोल्ड केलं अन् प्रीती झिंटानं उड्या मारत साजरा केला विजयाचा आनंद
मार्को यान्सेन आणि अर्शदीपनं अखेरच्या षटकात अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत पंजाबचा विजय निश्चित केला. या विजयानंतर पंजाब संघाची सह मालकीण प्रीती झिंटा हिचा आनंद गगनात मावेना असाच होता. स्टँडमध्ये बसलेली प्रीती झिंटा प्रत्येक विकेटनंतर उत्साहाने संघाला चीअर करताना दिसली. यान्सेन याने रसेलला क्लीन बोल्ड केल्यावर प्रीती झिंटा आनंदाने उड्या मारताना स्पॉट झाले.
प्रीतीनं गळाभेट घेत थोपटली फिरकीपटू चहलची पाठ
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ही आयपीएलमध्ये फक्त स्टँमध्ये बसून चीअर करत नाही. ती मैदानात येऊन खेळाडूंच्या खेळीला दादही देते. या ऐतिहासिक विजयानंतरही तिने हेच केले. ती मॅचचा हिरो ठरलेल्या चहलला भेटली. त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या अन् गळाभेट घेत घेऊन पाठ थोपटत त्याच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले. चहलशिवाय तिने कोच रिकी पाँटिंगसोबतही विजयाचा आनंद खास अंदाजात साजरा केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर ही गोष्टही चर्चेचा विषय ठरत आहे.
Web Title: IPL 2025 Preity Zinta Hugs Yuzvendra Chahal After PBKS's Wins Over KKR Viral Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.