IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच

Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians Record, IPL 2025 MI vs SRH: याआधी केवळ कायरन पोलार्डने ही कामगिरी केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:27 IST2025-04-18T18:27:21+5:302025-04-18T18:27:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 Rohit Sharma big record Only the second batter for Mumbai Indians after Kieron Pollard MI vs SRH | IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच

IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians Record, IPL 2025 MI vs SRH: लय हरवलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला आता हळूहळू लय सापडताना दिसतेय. सुरुवातीचे सामने हरल्यानंतर गुरुवारी मुंबई इंडियन्सने सलग दुसरा विजय मिळवला. त्यांनी सनरायजर्स हैदराबादचा ४ गडी आणि ११ चेंडू राखून पराभव केला. अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड या तिघांच्या छोटेखानी खेळीमुळे हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना २० षटकांत १६२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकला. मुंबईचा राजा रोहित शर्माने केवळ २६ धावाच केल्या, पण त्याच धावांच्या जोरावर त्याने मोठा पराक्रम केला आणि कायरन पोलार्डच्या यादीत स्थान मिळवले.

मुंबई इंडियन्सकडून खेळताना २५० षटकारांचा टप्पा पार

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्मा लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात त्याने जबरदस्त सुरुवात केली. पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याच्या भात्यातून ३ षटकार आल्याचे पाहायला मिळाले. त्याची खेळी बहरू लागली असतानाच तो बाद झाला. रोहितने त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर आणि मुख्यत्वे तीन षटकारांच्या जोरावर मुंबई इंडियन्सकडून २५० षटकारांचा टप्पा ओलांडला. अशी किमया आतापर्यंत केवळ कायरन पोलार्डलाच करता आली आहे. सध्या रोहितच्या नावे २२७ सामन्यात २५१ षटकार आहेत. यादीत पोलार्ड अव्वल असून त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना २११ सामन्यात २५८ षटकार खेचले आहेत.

रोहितचे वानखेडेवर षटकारांचे शतक

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडियम १०० षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाने या मैदानात अशी कामगिरी करुन दाखवलेली नाही. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यातील ३ षटकारासह रोहितच्या खात्यात या मैदानात १०२ षटकारांची नोंद झाली. या यादीत मुंबई इंडियन्सच्या संघाचा विद्यमान बॅटिंग कोच कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डच्या भात्यातून वानखेडेच्या मैदानात ८५ षटकार पाहायला मिळाले आहेत. सूर्यकुमार यादव ४८ षटकारासह तिसऱ्या, अंबाती रायडू ४३ षटकारांसह चौथ्या आणि जोस बटलर ४१ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

 

Web Title: IPL 2025 Rohit Sharma big record Only the second batter for Mumbai Indians after Kieron Pollard MI vs SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.