Priyansh Arya Preity Zinta Blush Dimple, IPL 2025 Punjab Kings: आयपीएलच्या हंगामात भारताला एक नवीन स्टार मिळाला. हा स्टार म्हणजे प्रियांश आर्य. त्याने पंजाब किंग्जकडून पदार्पण केले आणि फक्त ४ सामन्यांत आपली चमक दाखवून दिली. पंजाब किंग्जच्या या स्टार सलामीवीराने चौथ्याच सामन्यात स्फोटक शतक झळकावून संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. मैदानावर आपल्या स्फोटक फलंदाजीने गोलंदाजांना थक्क करणारा प्रियांश आपल्या शब्दांनीही मने जिंकू शकतो हे त्याने नुकतेच दाखवून दिले. पंजाब किंग्जची सह-मालकीण प्रीती झिंटा हिच्याशी मुलाखतीत गप्प मारताना एक छान किस्सा घडला.
प्रियांश आर्य बॅटिंग करताना खूप आक्रमक दिसत होता पण त्याची बोलण्याची शैली खूप शांत होती. जेव्हा प्रीती झिंटाने त्याला त्याच्या या शैलीबद्दल विचारले तेव्हा त्याच्या उत्तराने प्रीती झिंटा लाजली अन् तिच्या गाळावर खळी पडली. पंजाब किंग्जने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये प्रीती आणि प्रियांश बोलत आहेत. प्रीती म्हणाली की जेव्हा ती एक दिवस आधी प्रियांशला भेटली, तेव्हा तो खूप शांत होता आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने इतकी चांगली फलंदाजी कशी केली? त्यावर प्रियांश म्हणाला, "जेव्हा मी तुला भेटलो तेव्हा मला तू जे बोलत होतीस ते ऐकायला आवडत होतं, म्हणूनच मी काहीच बोललो नाही." त्याचे हे उत्तर प्रितीने स्मितहास्य केले.
प्रियांश आर्यचा मोठा विक्रम
आपला पहिलाच हंगाम खेळत असलेल्या २४ वर्षीय प्रियांश आर्यने त्याच्या पहिल्या सामन्यात ४७ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर त्याने चौथ्या सामन्यात आपला खरा खेळ दाखवला. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची त्याने यथेच्छ धुलाई केली. पंजाबकडून डावाची सुरुवात करताना एकीकडे विकेट्स पडत होत्या, पण दुसरीकडे प्रियांशने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर अवघ्या ३९ चेंडूत शतक झळकावले. आयपीएल इतिहासात कोणत्याही अनकॅप्ड फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक ठरले.
Web Title: IPL 2025 Video Preity Zinta blushes with dimples on cheek when Priyansh Arya gives sweet reply to her after Smashed century vs CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.