IPL Auction 2021 : चेतेश्वर पुजाराला MS Dhoni चा आधार; टाळ्यांच्या कडकडाटात झालं संघात स्वागत, Video

IPL Auction 2021 Cheteshwar Pujara CSK :  कसोटी फलंदाज म्हणून ठपका लागलेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 18, 2021 06:30 PM2021-02-18T18:30:28+5:302021-02-18T18:30:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2021 : Cheteshwar Pujara is back in the IPL after 7 years and there's a round of applause for him  | IPL Auction 2021 : चेतेश्वर पुजाराला MS Dhoni चा आधार; टाळ्यांच्या कडकडाटात झालं संघात स्वागत, Video

IPL Auction 2021 : चेतेश्वर पुजाराला MS Dhoni चा आधार; टाळ्यांच्या कडकडाटात झालं संघात स्वागत, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2021 :  कसोटी फलंदाज म्हणून ठपका लागलेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं त्याला ५० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. CSKच्या चमूत त्याचं नाव निश्चित झाल्यानंतर सर्व सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुजारानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही टीम इंडियासाठी 'मि. डिपेंडेबल'ची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलून तो टीम इंडियासाठी मजबूत भींतीसारखा खेळपट्टीवर अडून बसला होता. त्यामुळे आता पुजाराचे आयपीएलमध्ये पुनरागमन झालेलं पाहून सर्वांना आनंद झाला आहे. IPL Auction 2021 Live Today १ चेंडूंत १७ धावा देणाऱ्या गोलंदाजासाठी पंजाब किंग्सनं मोजले ८ कोटी!

२०१४मध्ये पुजारा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलपासून दूरच होता. पूजारा संघात दाखल झाल्यामुळे CSKला मधल्या फळीत आधार मिळू शकतो. पुजारानं आयपीएलच्या ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. शाहरुख खान खेळणार प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सकडून; २० लाखांहून थेट ५.२५ कोटींची भरारी 

cचेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings)  -
रिलीज खेळाडू : केदार जाधव, हरभजनसिंग, मुरली विजय, पीयूष चावला, मोनू कुमार, शेन वॉटसन;

रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन;

१९.९ कोटी शिल्लक - चेन्नईला ६ भारतीय खेळाडूंची जागा भरायची आहे.

Web Title: IPL Auction 2021 : Cheteshwar Pujara is back in the IPL after 7 years and there's a round of applause for him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.