IPL Auction 2021 : आयपीएल ऑक्शनच्या एक दिवस आधी संघाचं नाव बदलून दाखल झालेल्या किंग्स पंजाबनं ( Kings Punjab) ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson ) याच्यासाठी १४ कोटी मोजल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या. ऑस्ट्रेलियाच्या २४ वर्षीय गोलंदाजासाठी एवढी तगडी रक्कम का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण, त्यानं नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये २९ विकेट्स घेत साऱ्यांचे लक्ष वेधले होते. फेब्रुवारी २०१७मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आतापर्यंत त्यानं २ कसोटी, १२ वन डे व ९ ट्वेंटी-20 सामन्यांत ३९ विकेट्स घेतल्या आहेत. IPL Auction 2021 : परदेशी खेळाडूंवर पैशांचा धो धो पाऊस; इतिहासात प्रथमच तीन खेळाडूंसाठी लागली १४ कोटींहून अधिक बोली
१७८ cm उंचीमुळे प्रशिक्षकांनी त्याला जलदगती गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला. त्यां २१ ऑक्टोबर २०१५मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलं. त्याच वर्षी त्याचा ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघात समावेश केला गेला. १४०kph च्या वेगानं स्विंग करण्याची कला त्याच्याकडे आहे आणि यामुळेच त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचा भविष्याचा स्पीड स्टार म्हणून पाहिले जात आहे. बिग बॅश लिगच्या २०१६-१७ च्या हंगमात त्यानं ११ विकेट्स घेतल्या होत्या आणि अंतिम सामन्यात स्कॉचर्स संघाकडून ३ विकेट्स घेत विजतेपद पटकावून दिले होते. त्यानं न्यू साऊथ वेल्सविरुद्ध ४७ धावांच ८ विकेट्स घेत खळबळ माजवली होती. IPL Auction 2021 : विराट कोहलीची विकेट घेतली अन् मोईन अलीला लॉटरी लागली; चेन्नई सुपर किंग्सनं ओतला पैसा! IPL Auction 2021 Live Streaming, IPL Auction Live
भारताविरुद्धच्या २०१९ च्या मालिकेत त्यानं ३ सामन्यांत ८ विकेट्स घेतल्या होत्या. भारताविरुद्ध त्यानं एकूण ६ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यात विराट कोहलीच्याही विकेटचा समावेश आहे. , IPL Auction 2021 Latest Marathi News,
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)-
रिलीज खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, करु ण नायर, हार्डस विलोजेन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, शेल्डन कॉटरेल, जिमी नीशम, कृष्णप्पा गौथम, तिजंदर सिंह;
रिटेन खेळाडू : केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, सिमरन सिंह, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नळकांडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड़, इशान पोरेल;
५३.२० कोटी शिल्लक - ४ भारतीय व ५ परदेशी खेळाडूंसाठी रिक्त जागा
Web Title: IPL Auction 2021 : Jhye Richardson is sold to Punjab Kings at 14cr, know who is he
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.