IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?

Krunal Pandya Nitish Rana RR vs RCB, IPL Auction 2025 Players List: डावखुऱ्या फलंदाजांसाठी राजस्थान आणि बेंगळुरूचा आपसांत संघ जोरदार भिडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 04:33 PM2024-11-25T16:33:00+5:302024-11-25T16:33:14+5:30

whatsapp join usJoin us
ipl auction 2025 player auction full list base price great battle RR vs RCB for Krunal Pandya Nitish Rana | IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?

IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ir="ltr">Krunal Pandya Nitish Rana RR vs RCB, IPL Auction 2025 Players: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सध्या जेद्दाहमध्ये दोन दिवसीय लिलाव सुरु आहे. काल पहिल्या दिवशी ७२ खेळाडूंवर ४६७.९५ कोटींची बोली लावण्यात आली. आज लिलावाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही संघांंमध्ये तोच जोश पाहायला मिळाला. डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत नितीश राणा आणि कृणाल पांड्या या दोनही खेळाडूंंसाठी जोरदार टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला कृणाल पांड्याचे नाव आले. त्याची मूळ किंमत २ कोटी होती. त्याच्यावर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघांनी जोरदार बोली लावल्या. अखेर ५ कोटी ७५ लाखांना त्याला RCB ने घेतले. त्यानंतर नितीश राणासाठीही हेच दोन संघ भिडले. त्यात मात्र राजस्थानने बाजी मारली. दीड कोटींच्या मूळ बोलीवरून नितीश राणाला ४ कोटी २० लाखांनी विकत घेतले.

-----

दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघ लिलावात ६ खेळाडूंसह पोहोचला त्यांनी संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीला प्रत्येकी १८-१८ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. ध्रुव जुरेल आणि रियान पराग या दोघांना प्रत्येकी १४-१४ कोटी रुपये देऊन रिटेन केले. वेस्टइंडीजच्या शिमरॉन हेटमायरला ११ कोटी रुपयांसह संघात कायम ठेवले. तर संदीप शर्मा याला चार कोटींसह रिटेन केले.

तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ लिलावामध्ये तीन खेळाडूंसह आला. आरसीबीने विराट कोहलीला तब्बल २१ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले. त्या खालोखाल रजत पाटीदार याला ११ कोटी रुपयांसह संघात रिटेन केले. तर यश दयाल याला ५ कोटींच्या रकमेसह संघात कायम ठेवले.

Web Title: ipl auction 2025 player auction full list base price great battle RR vs RCB for Krunal Pandya Nitish Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.