पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या देवदत्त पडिक्कल याच्यावर RCB मेहरबान झाल्याचा सीन मेगा लिलावातील अंतिम फेरीत पाहायला मिळाला. याशिवाय अंजिक्य रहाणेसह ग्लेन फिलिपसाठीही खरेदीदारांची ट्यूब पेटली. मेगा लिलावातील अखेरच्या टप्प्यात सर्व फ्रँचायझी संघांना अनसोल्ड खेळाडूंसह उर्वरित अन्य काही खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. काही मिनिटांच्या ब्रेकनंतर अनसोल्ड खेळाडूंवर पुन्हा बोली लावण्यात आली. यात कोणत्या अनसोल्ड खेळाडूला कुणी किती खर्च करून आपल्या ताफ्यात घेतलं? त्यासंदर्भातील माहिती
देवदत्त पडिक्कल- आरसीबी
अखेरच्या फेरीत देवदत्त पडिक्कलच्या नावाने बोलीला सुरुवात झाली. RCB च्या संघाने या खेळाडूला २ कोटी या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. देवदत्त पडिक्कलनं आयपीएलची सुरुवात ही RCB च्या संघातूनच केली होती. २०१९ ते २०२० पर्यंत तो या फ्रँयायझी संघाकडून २० लाख रुपयांसह खेळला होता. २०२२ आणि २०२३ च्या हंगामात तो ७.५ कोटीसह राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. गत हंगामात या प्राइज टॅगसह तो लखनऊच्या ताफ्यात दिसला होता. यावेळी त्याचा भाव घसरला असला तरी शेवटच्या सामन्यात RCB च्या मेहरबानीमुळे त्याला किमान खेळण्याची एक संधी तरी मिळाली आहे.
अजिंक्य रहाणे- केकेआरपहिल्या फेरीत अनसोल्ड राहिलेल्या अंजिक्य रहाणेसाठी शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने १.५ कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. गत हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसले होते. गत दोन हंगामात CSK नं अंजिक्यसाठी प्रत्येकी ५०-५० लाख रुपये मोजले होते. यावेळी अनसोल्ड राहिल्यावर पुन्हा बोली लागली त्यावेळी त्याला १ कोटींचा फायदा झाल्याचे दिसून येते.
ग्लेन फिलिप्स -गुजरात टायटन्समेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनसोल्ड राहिला दुसरा खेळाडू होतो तो ग्लेन फिलिप्स. न्यूझीलंडच्या या संघालाही अखेरच्या फेरीत बोली लागली.
गुजरात टायटन्सच्या संघानं त्याला २ कोटी रुपयांसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. याआधीच्या ३ हंगामात तो १.५ कोटींसह सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले होते. त्याचा पगारही यावेळी ५० लाखांनी वाढला आहे.
Web Title: ipl auction 2025 player auction full list base price UNSOLD Ajinkya Rahane Devdutt Padikkal Glenn Phillips Sold In Final Round KKR RCB And GT
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.