IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम

Jaydev Unadkat creates history, IPL Auction 2025: सनरायजर्स हैदराबाद संघाने जयदेव उनाडकटला विकत घेताच IPL च्या इतिहासात एक नवा विक्रम घडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:37 PM2024-11-25T21:37:20+5:302024-11-25T21:39:21+5:30

whatsapp join usJoin us
ipl auction 2025 player auction full list Jaydev Unadkat creates history became first player ever to be sold 7 times Sunrisers Hyderabad begs him for 1 crore | IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम

IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ir="ltr">Jaydev Unadkat creates history, IPL Auction 2025 Live: आगामी हंगामासाठी सुरु असलेल्या मेगालिलावात पहिल्या दिवशी एकूण ७२ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या खेळाडूंसाठी ४६७ कोटींची उलाढाल झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा लिलाव आज सुरु झाला. आजच्या दिवसात आपल्या संघातील एकूण खेळाडूंचा स्लॉट पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वच संघांची धावपळ दिसून आली. पण या धावपळीत एका भारतीय खेळाडूने अनोखा विक्रम केला. मध्यमगती डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकट १ कोटींच्या मूळ किमतीवर लिलावात आला. त्याला सनरायजर्स हैदराबादच्या संघाने त्याच मूळ किमतीवर आपल्या संघात घेतले. यासह आयपीएल इतिहासातील ७ लिलावांमध्ये प्रत्येक वेळी बोली लागलेला जयदेव उनाडकट हा एकमेव खेळाडू ठरला.

-----

सनरायझर्स हैदराबाद संघ लिलावात पाच बड्या खेळाडूंसह उतरला. संघाने हेनरीक क्लासेन याला सर्वाधिक २३ कोटी रुपयांच्या रकमेसह संघात कायम ठेवले.ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याला १८ कोटींसह संघात रिटेन केले. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या दोघांना प्रत्येकी १४ कोटी देऊन संघात कायम ठेवण्यात आले तर उदयोन्मुख भारतीय खेळाडू नितीश रेड्डी याला ६ कोटी रुपयांसह संघाने रिटेन केले.

Web Title: ipl auction 2025 player auction full list Jaydev Unadkat creates history became first player ever to be sold 7 times Sunrisers Hyderabad begs him for 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.