Top 10 most expensive players, IPL Auction 2025: देशातील सर्वात श्रीमंत अशा टी२० लीग स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी जेद्दाह येथे दोन दिवसांची लिलाव प्रक्रिया पार पडली. २४ आणि २५ नोव्हेंबर या दोन दिवसात एकूण ५७७ खेळाडूंपैकी १८२ खेळाडूंना आपला संघ मिळाला. या दोन दिवसांत IPL च्या १० संघांनी मोठमोठ्या बोली लावत तब्बल ६३९.१५ कोटी रुपये खर्च केले. लखनौ सुपरजायंट्स संघाने यंदाच्याच नव्हे तर IPL इतिहासातील सर्वोच्च बोली लावून २७ कोटींना रिषभ पंतला विकत घेतले. श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) आणि वेंकटेश अय्यर (२३.७५ कोटी) हे TOP 3 महागडे खेळाडू ठरले. पाहूया यंदाच्या लिलावातील सर्वाधिक बोली मिळवणारे TOP 10 महागडे खेळाडू...
IPL 2025 साठीच्या लिलावातील TOP 10 महागडे खेळाडू -
- रिषभ पंत (भारत) - लखनौ सुपरजायंट्स - २७ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- श्रेयस अय्यर (भारत) - पंजाब किंग्ज - २६ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- वेंकटेश अय्यर (भारत) - कोलकाता नाइट रायडर्स - २३ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- अर्शदीप सिंग (भारत) - पंजाब किंग्ज - १८ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- युजवेंद्र चहल (भारत) - पंजाब किंग्ज - १८ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- जॉस बटलर (इंग्लंड) - गुजरात टायटन्स - १५ कोटी ७५ लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- केएल राहुल (भारत) - दिल्ली कॅपिटल्स - १४ कोटी (मूळ किंमत - २ कोटी)
- ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) - मुंबई इंडियन्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोफ्रा आर्चर (इंग्लंड) - राजस्थान रॉयल्स - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
- जोश हेजलवूड (ऑस्ट्रेलिया) - १२ कोटी ५० लाख (मूळ किंमत - २ कोटी)
दोन दिवसांच्या लिलाव प्रक्रियेत चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या तिघांनीच आपला २५ खेळाडूंचा ताफा पूर्ण केला. लिलावाअंती प्रत्येक संघात रिटेन केलेले आणि नव्याने खरेदी केलेले मिळून एकूण कमीत कमी १८ खेळाडू असणे आवश्यक होते. त्यानुसार लिलाव संपल्यानंतर आता, लखनौ सुपरजायंट्सकडे २४, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे २३, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे २२, कोलकाता नाइट रायडर्सकडे २१ तर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाकडे २० खेळाडू समाविष्ट आहेत.
Web Title: ipl auction 2025 player full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg kkr list of TOP 10 most expensive players featuring Rishabh Pant Shreyas Iyer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.