इरफान पठाणनं जानेवारी 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. फेब्रुवारी 2019मध्ये तो अखेरचा अधिकृत क्रिकेट सामना खेळला होता. त्यानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये इरफान मैदानावर उतरणार आहे. लंका प्रीमिअर लीगमध्ये ( LPL) सहभागी होणाऱ्या 70 परदेशी खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये इरफानच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) च्या नियमानुसार सक्रिय क्रिकेटपटू परदेशी लीगमध्ये खेळू शतक नाही, परंतु इरफाननं निवृत्ती घेतल्यामुळे बीसीसीआय त्याला परवानगी देण्याची शक्यता आहे. (Lanka Premier League)
पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय?
So Cute : हार्दिक-नताशाचं बाळ दिसतं कसं माहित्येय? ज्युनियर पांड्याचा फोटो व्हायरल
आता लंका प्रीमिअर लीमगध्ये सहभागी झालेल्या 5 संघांपैकी लिलावात आपल्या ताफ्यात दाखल करून घेणं गरजेचं आहे. ड्रफ्ट, फ्रँचायझी मालक यांची अंतिम घोषणा अद्याप झालेली नाही. श्रीलंका क्रिकेट मंडळाला अद्याप त्यांच्या सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. कोलंबो, कँडी, गेल, डॅम्बुला आणि जाफ्ना या पाच फ्रँचायझी या लीगमध्ये खेळणार आहेत. (Lanka Premier League)
श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू फवीझ महारूफ यांच्या आणि इरफान यांच्यातल्या इस्टा चॅटवरून ही गोष्ट समोर आली. त्यात महारुफनं सांगितले की इरफानचा ड्राफ्टमध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्यानंही त्याच्या स्वीकार केला आहे. सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर या लीगचा मार्ग मोकळा होईल. सामने पाहण्यासाठी काही मोजक्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा विचारही श्रीलंका क्रिकेट मंडळ करत आहे. जून महिन्यात श्रीलंकेतील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे, परंतु अजूनही केवळ परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी विमान प्रवास सुरू आहे. (Lanka Premier League)
इरफाननं भारताकडून 29 कसोटी, 120 वन डे आणि 24 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 1105 धावा आणि 100 विकेट्स आहेत. वन डे आणि ट्वेंटी-20त त्यानं अनुक्रमे 1544 धावा व 173 विकेट्स आणि 172 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: Irfan Pathan will return to the field; Will play Lanka Premier League next month!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.