क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत

कोरोना व्हायरसमुळे देशात 548 जिल्ह्यांत लॉकडाऊनची परिस्थिती आहे.  देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे, तर मृतांचा आकडा 10 वर गेला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 04:05 PM2020-03-24T16:05:16+5:302020-03-24T16:06:07+5:30

whatsapp join usJoin us
Irfan Pathan, Yusuf Pathan donate masks as Coronavirus scare grows in India svg | क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत

क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचे क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांनी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी 4000 मास्क दान केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे आणि त्यात त्यांनी हे मास्क स्थानिक अॅडमिनिस्ट्रेशनला देणार असल्याचे जाहीर केले. जेणेकरून हे मास्क गरजू लोकांपर्यंत पोहोचतील.

''वडीलांच्या नावानं एक संस्था काम करत आहे आणि त्यांच्याकडे हे मास्क दिले जातील. त्यानंतर ते आरोग्य विभागाकडे पोहोचतील,'' असे इरफाननं व्हिडीओत सांगितले आहे. त्यानं पुढे लिहीले की,''समाजासाठी आम्ही आमच्याकडून सहकार्य करत आहे. तुम्हीही पुढाकार घ्या आणि जमेल तशी मदत करा. ही सुरुवात आहे आणि अजून पुढे मदत करत राहू.'' 


कोरोना व्हायरसमुळे देशात 548 जिल्ह्यांत लॉकडाऊनची परिस्थिती आहे.  देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे, तर मृतांचा आकडा 10 वर गेला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

दरम्यान, भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियानंही त्याचा सहा महिन्यांचा पगार हरयाणा राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता बजरंग रेल्वेत ऑफिस ऑन स्पेशल ड्युटी ( OSD) पदावर कामावर आहे. ''मी सहा महिन्याचा पगार दान करण्याचा निर्णय घेतला आहे,''असे बजरंगने सांगितले. त्याच्या या पुढाकाराचा केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजीजूनं  कौतुक केले.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाचा पुढाकार; सरकारला कोट्यवधींची मदत
श्रीलंकेलाही कोरोना व्हायरसशी झळ पोहोचली आहे. या व्हायसरशी मुकाबला करण्यासाठी तेथील सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मदतीला श्रीलंका क्रिकेट धावून आले आहेत. त्यांनी सरकारला 1 कोटी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेता आतापर्यंत या व्हायरसमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  श्रीलंका क्रिकेटनं सरकारला मदत करण्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे. ''कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारला 1 कोटींची मदत करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेटने घेतला आहे,'' अशी त्यांनी माहिती दिली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

Video : जगातला अव्वल अष्टपैलू क्रिकेटर आयसोलेशनमध्ये; मुलीला पाहता येत नसल्यानं झाला भावुक

चिनी लोकांवर भडकला इंग्लंडचा क्रिकेटपटू; हासडली F#@#@G सणसणीत शिवी

Web Title: Irfan Pathan, Yusuf Pathan donate masks as Coronavirus scare grows in India svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.