2012 व 2013 मध्ये सोशल मीडियावर भडकावू व वर्णद्वेषी ट्विट करणाऱ्या ऑली रॉबिन्सनवर आयसीसीनं 2021मध्ये कारवाई करताना प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबनाची कारवाई केली आहे. विसडननं दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडचा आणखी एक खेळाडू अशाच प्रकरणात अडकणार आहे आणि त्याचाही तपास सुरू झाला आहे. दरम्यान, इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यानं सहावर्षापूर्वी केलेलं ट्विट व्हायरल होऊ लागलं आहे. त्यात त्यानं भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्यावर टीका केली होती. IPL 2021ला वाचवण्यासाठी BCCI नं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा दिलाय बळी?; एका निर्णयानं वाढवली आयसीसीची डोकेदुखी
जोफ्रा आर्चर मैदानावरील त्याच्या कामगिरीसोबतच सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळेही चर्चेत असतो. ट्विटरवरील त्याच्या अनेक पोस्टचा वर्तमानकाळाशी संदर्भ लावून त्याला ज्योतिषाचार्य असेही संबोधले जाते. पण, सध्या इंग्लंड क्रिकेट वर्तुळाला धक्का देणाऱ्या घटना घडत आहेत आणि त्यात जोफ्राचं ट्विट व्हायरल झाल्यानं त्यांची धाकधुक वाढली आहे. 26 वर्षीय जोफ्रानं सहा वर्षांपूर्वी हे ट्विट केलं होतं आणि ते रोहित शर्मासंदर्भात होतं. जोफ्रानं 2018मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. रवींद्र जडेजा अन् पत्नीचं कौतुकास्पद कार्य; लेकीच्या वाढदिवसाला गरीब मुलींच्या खात्यात जमा केले पैसे!
आयपीएल 2014च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीदरम्यानचं ट्विट आहे. त्यात त्यानं रोहित शर्माला हा मुर्खपणा आहे, असं ट्विट केलं होतं. बाबो! 13 षटकार, 7 चौकार, 28 चेंडूंत झळकावलं शतक; टी 10 सामन्यात उभा केला धावांचा एव्हरेस्ट
या सामन्यात राजस्थाननं 4 बाद 189 धावा कुटल्या. मुंबईला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं होतं, परंतु त्यांची सुरुवात निराशाजनक झाली. पण, कोरी अँडरसनच्या 44 चेंडूंत 95 धावांच्या खेळीनं मुंबईनं विजय मिळवला होता.
12 ऑक्टोबर 2020मध्ये मुंबईतील अनेक भागांत लाईट्स गेल्या होत्या आणि तेव्हाही जोफ्राचं जूनं ट्विट व्हायरल झालं होतं.मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, मुंबईची बत्ती गुल झाल्यानंतर इंग्लंड आणि राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) याचं ७ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल झालं होतं. आर्चरचे २०१३सालचे ट्विट व्हायरल झाले होते. २२ मार्च २०१३ मध्ये आर्चरनं Lights Out असे ट्विट केलं होतं.
Web Title: Jofra Archer's 2014 Tweet Slamming Rohit Sharma Goes Viral; Check Here
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.