England vs West Indies 3rd Test: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं वर्चस्व गाजवले. पण, दुसऱ्या दिवसाची सुरुवात त्यांना हवी तशी झाली नाही. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऑली पोप ( 91) आज एकही धावेची भर न घातला माघारी परतला. त्यापाठोपाठ जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनाही माघारी पाठवण्यात विंडीज गोलंदाजांना यश आलं. वोक्सला माघारी पाठवून केमार रोचनं वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. तब्बल 26 वर्षांनंतर विंडीजच्या गोलंदाजाला हे यश मिळवता आलं आहे.
जोस बटलर आणि ऑली पोप यांनी दमदार भागीदारी करताना संघाला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 258 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केमार रोचनं पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलमीवीर डॉम सिब्ली याला बाद केले. कर्णधार जो रूट ( 17) धावबाद आणि बेन स्टोक्स ( 20) यांनाही फार कमाल दाखवता आली नाही. रोरी बर्न्स आणि ऑली पोप यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर बर्न्स माघारी परतला. स्लीमध्ये उभ्या असलेल्या रहकीमनं चपळाईनं त्याचा झेल टिपला. बर्न्स 57 धावा करून माघारी परतला. (Kemar Roach reach 200 Test wickets )
त्यानंतर पोप आणि बटलर ही जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून बसली. दोघांनी दिवसअखेर इंग्लंडचा एकही फलंदाज बाद होऊ दिला नाही. पोप 142 चेंडूंत 11 चौकारांसह 91 धावांवर, तर बटलर 120 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार खेचून 56 धावांवर नाबाद होते. पण, दुसऱ्या दिवशी पोपला एकही धाव न काढता शॅनोन गॅब्रीएलनं त्रिफळाचीत केलं. त्यानंतर केमार रोचनं वोक्सला आणि गॅब्रीएलनं बटलरला ( 67) बाद केले. (Kemar Roach reach 200 Test wickets )
केमार रोचनं कसोटी क्रिकेटमध्ये 200 वी विकेट घेतली. 1994नंतर प्रथमच विंडीज गोलंदाजाला कसोटीत 200 विकेट्स घेता आल्या आहेत. कर्टनी अँम्ब्रोज यांच्यानंतर हा मान मिळवणारा रोच पहिलाच गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत विंडीजच्या 9 गोलंदाजांनी 200 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.(Kemar Roach reach 200 Test wickets )
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!
केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल!
140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video
शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!
मुंबई इंडियन्सच्या जेतेपदानंतर टीमसमोरच त्यानं केलं फिल्मी स्टाईल प्रपोज अन्...
IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी अन् चेन्नई सुपर किंग्स यूएईत लवकर दाखल होणार!
Web Title: Kemar Roach has become the first West Indian bowler since Curtly Ambrose in 1994 to reach 200 Test wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.