KKR vs KXIP Latest News : कोलकाताच्या फलंदाजांचा सावळा गोंधळ; दोघंही एकाच एंडला अऩ... Video

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना सुरू आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 04:02 PM2020-10-10T16:02:52+5:302020-10-10T16:10:54+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs KXIP Latest News : Huge mix up between Shubman Gill  and Nitish Rana; that has led to a run out, Video | KKR vs KXIP Latest News : कोलकाताच्या फलंदाजांचा सावळा गोंधळ; दोघंही एकाच एंडला अऩ... Video

KKR vs KXIP Latest News : कोलकाताच्या फलंदाजांचा सावळा गोंधळ; दोघंही एकाच एंडला अऩ... Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सामना सुरू आहे. KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) अनपेक्षित विजय मिळवणाऱ्या KKRचा आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळाला. पण, CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलनं शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणानं क्रिज सोडलं. पण, गिलचं त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. KKR vs KXIP Latest and Live News

Kolkata Knight Riders XI: राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, नितिश राणा, सुनील नरीन, इयॉन मॉर्गन, इयॉन मॉर्गन, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, पी कृष्णा, वरुण चक्रवर्थी 

Kings XI Punjab XI: लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, सिम्रन सिंग, निकोलस पुरन, ग्लेन मॅक्सवेल, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, ख्रिस जॉर्डन, अर्शदीप सिंग  

पाहा व्हिडीओ
 

Web Title: KKR vs KXIP Latest News : Huge mix up between Shubman Gill  and Nitish Rana; that has led to a run out, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.