Join us  

सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टीम इंडियाच्या फलंदाजाला ही जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:57 AM

Open in App

महाराष्ट्र सरकारने भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांना जोरदार झटका दिला आहे. मुंबईच्या पॉश वांद्रे भागातील २,००० चौरस मीटर जमीन अजिंक्य रहाणेला देण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टीम इंडियाच्या फलंदाजाला ही जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली. 

हा सुनिल गावसकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. इनडोअर ट्रेनिंग अकादमी सुरू करण्यासाठी गावसकर यांना १९८८ मध्ये हा प्लॉट देण्यात आला होता. 36 वर्षांपूर्वी गावस्कर यांना प्रथम भूखंड वाटप करण्यात आला होता, परंतू त्याचा विकास न केल्याने हा भुखंड गावसकरांकडून परत काढून घेण्यात आला आहे, असे नोटमध्ये म्हणण्यात आले आहे.

गावसकरांनी या भूखंडावर काहीच बांधले नाही. तो असाच पडून राहिल्याने झोपडपट्टीतील रहिवासी अयोग्य कारणांसाठी वापरत आहेत. यामुळे हा भूखंड वाईट अवस्थेत असल्याचे ताशेरे सरकारने ओढले आहेत. ‘सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्ट’ला दिलेला हा भूखंड मे २०२२ मध्येच सरकारने परत आपल्या ताब्यात घेतला होता. 

आता हा भूखंड अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला ३० वर्षांच्या लीजवर देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने पाठविला होता. त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :सुनील गावसकरअजिंक्य रहाणेएकनाथ शिंदे