12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:57 AM2019-08-19T11:57:30+5:302019-08-19T12:07:27+5:30

whatsapp join usJoin us
Marnus Labuchagne is 1'st Cricketer who Bat as a 12th player | 12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन - क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण रविवारी आटोपलेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत जे काही झाले ते क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. या लढतीच्या शेवटच्या दिवशी दुखापतग्रस्त झालेला ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्हन स्मिथ याच्या जागी चक्क 12 वा खेळाडू मार्न्स लाबुशेन फलंदाजीसाठी आला. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये 12 खेळाडू असूनही सामन्यात फलंदाजी करणारा लाबुशेन हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

 त्याचे झाले असेकी, लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले. 


दरम्यान, 1 ऑगस्टपासून आयसीसीने काही नियम बदलले असून, या बदललेल्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू सामन्यादरम्यान जखमी झाला तर त्याच्याऐवजी बदली खेळाडूला उर्वरित लढतीत खेळण्याची परवानगी देण्यात देण्यात आलेली आहे. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन स्मिथच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने धैर्याने खेळ करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवण्यात मोलाचा वाटा उचलला. 

यापूर्वी एखादा खेळाडू सामन्यादरम्यान जखमी झाल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडून क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी असे. मात्र अशा बदली खेळाडूस फलंदाजी व गोलंदाजी करता येत नसे. मात्र आता बदली खेळाडूलाही संपूर्ण सामन्यात खेळण्याची संधी मिळू लागली आहे. तसेच अशी संधी मिळणारा लाबुशेन हा गेल्या 142 वर्षांमधील पहिला खेळाडू ठरला आहे.  

Web Title: Marnus Labuchagne is 1'st Cricketer who Bat as a 12th player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.