ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स 

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही भारताबाहेरच होण्याची शक्यता बळावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 04:59 PM2021-06-26T16:59:40+5:302021-06-26T17:00:25+5:30

whatsapp join usJoin us
May have to shift ICC T20 World Cup to UAE due to COVID-19: BCCI secretary Jay Shah | ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार?; बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही भारताबाहेरच होण्याची शक्यता बळावली आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही यूएईत खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आले. बीसीसीआयचे  सचिव जय शाह यांनही कदाचित ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत खेळवला जाऊ शकतो असे संकेत ANIशी बोलताना दिले.

Big News : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख ठरली, IPL 2021 संपताच दोन दिवसांत सुरू होणार 'रणसंग्राम'!

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या घरात गेली आहे. २०२०-२१ मध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती, परंतु एप्रिल व मे या महिन्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. एका दिवसाला ४ लाख रुग्णांची भर पडल्याचे आकडेवारी सांगते. आयपीएल २०२१साठी बीसीसीआयनं तयार केलेलं सुरक्षित बायो बबलमध्येही कोरोनानं शिरकाव केला अन् एकामागून एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे स्पर्धा स्थगित करावी लागली. 

India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मधल्या फळीत पडणार एकाची विकेट?

''देशातील कोरोना परिस्थिती पाहता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत शिफ्ट केला जाऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाचे आहे. लवकरच आम्ही याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करू,''असे जय शाह यांनी सांगितले.


 बीसीसीआयनं आयपीएल २०२१चे उर्वरित सामने यूएईत खेळवण्याची घोषणा केली आहे. १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडण्याची शक्यता आहे,   

Web Title: May have to shift ICC T20 World Cup to UAE due to COVID-19: BCCI secretary Jay Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.