IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

MI vs CSK IPL 2020 अबु धाबी ( Abu Dhabi ) येथे MI vs CSKसामना खेळवण्यात आला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 22, 2020 03:22 PM2020-09-22T15:22:53+5:302020-09-22T15:23:32+5:30

whatsapp join usJoin us
MI vs CSK IPL 2020 opener registers highest-ever opening day viewership for any sporting league globally | IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) 13व्या पर्वाला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020 होणार की नाही, याबाबत सर्वांना साशंकता होती. कोरोना व्हायरसमुळे 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यात देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं BCCI आणि IPL फ्रँचायझींची चिंता वाढवली होती. त्यावर तोडगा म्हणून IPL 2020 UAEत खेळवण्याचा निर्णय झाला आणि अखेर 19 सप्टेंबरपासून IPL ला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. MI vs CSK च्या पहिल्याच सामन्यानं Record Break केला. BCCI चे सचिव जय शाह यांनी याबाबतची मोठी घोषणा केली. ( RCB vs SRH Live Score & Updates 

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुनावत आहेत ‘हे’ दोन विक्रम

अबु धाबी ( Abu Dhabi ) येथे MI vs CSKसामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं ( MI) 9 बाद 162 धावा केल्या. सौरभ तिवारी ( Saurabh Tiwari) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी अनुक्रमे 42 व 33 धावा करताना MIला समाधानकारक पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा ( Rohit Sharma), हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. CSKच्या लुंगी एनगिडीनं सर्वाधिक 3, तर दीपक चहर व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ( RCB vs SRH Live Score & Updates 

गेल्या 6 आयपीएल सामन्यांत कोहलीचा स्ट्राईक रेट शंभरच्या वर, पण...

लक्ष्याचा पाठलाग करताना CSKचे दोन्ही सलामीवीर 6 धावांवर माघारी परतले. फॅफ डू प्लेसिस ( Faf du Plessis) आणि अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) यांनी अनुक्रमे 58 व 71 धावा करताना CSKचा विजय पक्का केला. CSKनं IPLमधील मुंबई इंडियन्सविरुद्धची मागील पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडीत केली. CSKनं हा सामना 5 विकेट्स राखून जिंकला. ( RCB vs SRH Live Score & Updates )

आता कोणता विक्रम नोंदवला?
MI vs CSK यांच्यातला सलामीच्या सामन्यानं सर्वाधिक viewership चा विक्रम नोंदवला. BCCIचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट केलं की,''IPLच्या सलामीच्या सामन्यात नव्या विक्रमाची नोंद झाली. BARCच्या आकडेवारीनुसार MI vs CSKहा सामना जवळपास 20 कोटी लोकांनी पाहिला. आतापर्यंतच्या कोणत्याच लीगच्या पहिल्या सामन्याला एवढी viewership मिळालेली नाही. हा आकडा स्टार स्पोर्ट्स चॅनेल व हॉटस्टार यांची मिळून आकडेवारी आहे.''  


Web Title: MI vs CSK IPL 2020 opener registers highest-ever opening day viewership for any sporting league globally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.