MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) प्ले ऑफमधील स्थान पक्क करण्यासाठी एक विजय पुरेसा आहे. तेच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) एक पराभव म्हणजे स्पर्धेतूनच बाद झाल्यासारखे आहे. आज पराभूत झाले तरी MI ला फरक पडणार नसला तरी CSKसाठी पराभव जिव्हारी लागणारा ठरेल. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या संघाची अग्निपरीक्षा आहे. यापुढे त्यांना प्रत्येक पाऊल विचार करूनच टाकावं लागेल. पण, या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहेत. रोहितच्या अनुपस्थितीत किरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) शेन वॉटसनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि नटराजन जगदीसन यांना आजच्या सामन्यात संधी दिली. पण, त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. ऋतुराज ( ०) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहनं दोन धक्के दिले. अंबाती रायूडू ( २) व नटराजन ( ०) सलग दोन चेंडूवर माघारी परतले. चेन्नईची अवस्था ३ बाद ३ अशी झाली होती. ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात फॅफ ड्यू प्लेसिसला ( १) बाद करून CSKला मोठ्या अडचणीत आणले. चेन्नईच्या या अवस्थेनंतर त्यांनी सामन्यापूर्वी केलेलं ट्विट व्हायरल होऊ लागलं आहे. त्यात शाहजा स्टेडियमवर दाखल होताना चेन्नईनं Salaam Bombay असं ट्विट केलं होतं.
आता आजच्या पराभवानंतर ते मायदेशात म्हणजे थेट यूएई ते मुंबई असे परत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
Mumbai Indians XI: सौरभ तिवारी, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, नॅथन कोल्टर-नायल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
Chennai Super Kings XI: सॅम कुरन, फॅफ ड्यू प्लेसिस, राहुल गायकवाड, अंबाती रायुडू, नटराजन जगदीसन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, जोश हेझलवूड, दीपक चहर, इम्रान ताहीर, शार्दूल ठाकूर
Web Title: MI vs CSK Latest News: Chennai Super Kings 4 batsman's out for 3 runs; The 'they' tweet made before the match went viral!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.