-ललित झांबरे
अलीकडे क्रिकेटचे सामने एवढ्या मोठ्या संख्येने खेळले जात आहेत की विक्रमांचेही काही नाविन्य राहिलेले नाही. हॕट्ट्रीकचेही ( Hat trick) तसेच झाले आहे. रविवारी दुबईत (Dubai) राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB) हर्षल पटेलने (Harshal Patel) केलेली हॕट्ट्रीक ही आयपीएलमधील 20 वी हॕट्ट्रीक होती. लागोपाठच्या चेंडूवर त्याने हार्दिक, पोलार्ड व राहुल चाहरला बाद केले पण आधीच 19 हॕट्ट्रिक नोदल्या गेलेल्या असल्याने तसे नाविन्य नव्हते.पण एका वेगळ्या नोंदीने मात्र हर्षल पटेलची ही हॕट्ट्रिक नाविन्यपूर्ण ठरविली आहे.
विराट कोहलीनं RCBसाठी सामना जिंकला, पण मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचं मनही जिंकलं, Video
ही नोंद म्हणजे हर्षल पटेल हा केवळ दुसरा असा गोलंदाज आहे ज्याने आयापीएलमध्ये स्वतः हॕट्ट्रिक कमावलीसुध्दा आहे आणि दुसऱ्या एखाद्या गोलंदाजाच्या हॕट्ट्रिकमध्ये तो स्वतः बादसुध्दा झाला आहे.
हर्षल पटेलने आपल्या कारकिर्दीतील पहिली हॕट्ट्रिक रविवारी नोंदवली पण त्याआधी 2019 मध्ये सॕम करनच्या हॕटट्रिकमधील तीन विकेटपैकी एक विकेट त्याची स्वतःची होती. 1 एप्रिल 2019 रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी सॕम करनने (Sam Curran) हॕटट्रिक घेतली होती त्यातील पहिली विकेट हर्षल पटेलचीच होती.
थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं बाजी मारली, नेटिझन्सना अनुष्का शर्मा आठवली
ह्याच्याआधी रोहीत शर्माच्या (Rohit Sharma) बाबतीत अशी नोंद आहे. रोहितने 2009 च्या आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्ससाठी मुंबई इंडियन्सविरुध्द हॕटट्रिक केली होती पण 2017 मध्ये राॕयल चॕलेंजर्साच्या सॕम्युएल बद्रीच्या (Samuel Badree) हॕटट्रीकमध्ये तो स्वतः बाद झाला होता. त्यावेळी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहितला बाद करुनच बद्रीने आपली हॕट्ट्रिक पूर्ण केली होती. याप्रकारे आयपीएलमध्ये हॕट्ट्रिक ही नवी बाब नसली तरी रोहित शर्मा व हर्षल पटेलच्या हॕट्ट्रिक वेगळ्या ठरल्या आहेत.
Web Title: mi vs rcb match harshal patel creates history takes hattrick
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.