MI vs SRH Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) आज शाहजाह स्टेडियमवर पुन्हा चौकार-षटकारांची आतषबाजी झाली. मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) कडून धावांचा धो धो पाऊस पडेल अशी आशा होती, परंतु रोहित शर्मा ( Rohit Sharma)च्या अपयशानं ती फोल ठरली. सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad)च्या गोलंदाजांचंही कौतुक करायला हवं. विशेषतः रशीद खान व टी नटराजन यांचे... मुंबई इंडियन्सनं कसाबसा दोनशे धावांचा पल्ला पार केला. धावांचा पाठलाग करणाऱ्या SRHकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर ( David Warner) एकटाच खिंड लढवताना दिसला. पण, त्यालाही इशान किशननं अप्रतिम झेल टिपून माघारी पाठवले.
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी IPLमध्ये इतिहास घडवला; असा कोणता विक्रम केला?
प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानं MIचे चाहते निराश झाले. क्विंटन डी कॉकने फटकेबाजी करून ती निराशा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड यांनी अखेरच्या षटकांत धावा चोपल्या. पण, मुंबईच्या चाहत्यांना अपेक्षित असलेली धावसंख्या उभारण्यात MI अपयशी ठरला. रोहितनं खणखणीत षटकार मारून स्वागत केल्यानंतरही संदीप शर्मानं पुढच्या चेंडूवर MIला धक्का दिला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी MIचा डाव रुळावर आणला. पण, सिद्धार्थ कौलनं ( Siddarth Kaul) चतुराईनं यादवला माघारी पाठवले. यादवने 18 चेंडूंत 27 धावा केल्या.
मनीष पांडेच्या 'सुपर' डाईव्हनं मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, Video
क्विंटन एका बाजूनं फटकेबाजी करत होता. क्विंटन ३९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारून ६७ धावांवर माघारी परतला. इशान किशन ३१ धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) यांनी अखेरच्या षटकात पुन्हा फटकेबाजी केली, परंतु टी नटराजनच्या यॉर्करसमोर त्यांना आणखी फटकेबाजी करता आली नाही. हार्दिक 28 धावांवर त्रिफळाचीत झाला. कृणाल पांड्यानं अखेरच्या चार चेंडूंवर २० धावा चोपून मुंबई इंडियन्सला ५ बाद २०८ धावांपर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी SRH पहिल्या दोन षटकात खोऱ्यानं धावा ओढल्या. पाचव्या षटकात बेअरस्टो ( 25) ला ट्रेंट बोल्टनं बाद केले. त्यानंतर वॉर्नर आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. जेम्स पॅटिन्सननं ही भागीदारी तोडली. त्यानं मनीष पांडेला 30 धावांवर माघारी पाठवले. वॉर्नरने 34 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने मात्र SRH धक्के बसले. केन विलियम्सन ( 3) धावांवर ट्रेंट बोल्टने बाद केले. त्यामुळे वॉर्नरवरील दडपण वाढत गेले. त्यात प्रियम गर्गनं त्याची विकेट टाकली. १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कृणालनं टाकलेला फुलटॉस गर्गनं उत्तुंग टोलावला. पण, सीमारेषेवर राहुल चहरनं तितक्याच चतुराईनं तो टिपला.
अजिंक्य रहाणे CSK कडून खेळणार; MS Dhoniची Openingची चिंता मिटणार? जाणून घ्या कसं
SRHवरील दडपण वाढवण्यात मुंबईच्या गोलंदाजांनी यश मिळवलं आणि त्याचा फायदा त्यांना झाला. हैदराबादचा अखेरचा आशास्थान वॉर्नरला बाद करून मुंबईने सामन्यात चुरस निर्माण केली. इशान किशननं शॉर्ट थर्डमॅनवर वॉर्नरचा झेल टिपला. वॉर्नर 44 चेडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ६० धावा करून माघारी परतला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: MI vs SRH Latest News : A fine catch by Ishan Kishan ends David Warner's stay out there in the middle, video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.