कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचे सावट आहे. त्यात गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने आयपीएल आयोजनला तीव्र विरोध दर्शवला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आयपीएल आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. पण, परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र विरोध दर्शवताना अंतिम निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( बीसीसीआय) सोपवला आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले की,'' आयपीएल खेळवायची की नाही, याचा निर्णय आयोजकांनी घ्यावा. यंदा आयपीएल घेऊ नका, असा आमचा सल्ला असेल. पण, तरीही त्यांना लीग खेळवायची असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा.'' दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्र किरण रीजीजू यांनी आयपीएल खेळवत असाल तर प्रेक्षकांविना खेळवा, असा सल्ला दिला आहे.
दरम्यान,
आयपीएल 2020 आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वांच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (
बीसीसीआय) देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पर्धा घेताना त्या बंद स्टेडिमयवर म्हणजेच प्रेक्षकांविनाच घ्या असे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत.
IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा सचिव राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले की,''जर एखादी स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवता येत असेल तरच त्याचे आयोजन करा. तेथे अधिकाधिक लोकं जमणार नाही याची काळजी घ्या.'' बीसीसीआय योग्य ती काळजी घेईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं IANSला सांगितले. ते म्हणाले,''खेळाच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या आणि लीगच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीवर बीसीसीआयचे नियंत्रण नाही.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका
मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!
OMG : आंतरराष्ट्रीय खेळाडूला Corona Virusची लागण, संपूर्ण लीग करावी लागली रद्द
BCCI ची कोंडी; IPL 2020 चा निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन
Web Title: Ministry of External Affairs advises against holding of IPL but leaves final decision to BCCI svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.