ICC Women's T20 World Cup, Final: महिलांच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. भारतीय महिला संघांनी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला असून त्यांच्यासमोर चार वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर गटातील सरस कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 5 धावांनी विजय मिळवला. जागतिक महिला दिनी दोन्ही संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार आहे आणि तो पाहण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. पण, सर्वाधिक उत्सुक आहे तो स्टार गोलंदाज. त्यानं आपल्या पत्नीला फायनलमध्ये खेळताना पाहण्यासाठी राष्ट्रीय संघासोबतचा दौरा अर्ध्यावर सोडला आणि थेट मेलबर्नसाठी रवाना झाला.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कनं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार्कची पत्नी अॅलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि पत्नीला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना पाहण्यासाठी स्टार्कने हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघ आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि वन डे मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी होणार आहे. पण, आता स्टार्क त्यात खेळणार नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलिया 0-2 अशा पिछाडीवर आहे. स्टार्कच्या जागी अंतिम अकरामध्ये स्थान पटकावण्यासाठी जोश हेझलवूड, झाय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन यांच्यात चुरस रंगणार आहे. ''पत्नीला वर्ल्ड कप फायनल खेळताना पाहण्याची संधी ही आयुष्यात एकदाच मिळणार आहे आणि त्यामुळे अॅलिसाला चिअर करण्यासाठी स्टार्कने मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे,'' अशी माहिती ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिली.
ट्वेंटी-20त Hardik Pandyaची आणखी एक वादळी खेळी, 20 षटकारांची आतषबाजी
IPL 2020 : Rohit Sharma म्हणतो यंदाचे जेतेपद आमचेच, सांगितलं अनोखं लॉजिक!
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं नाही दिली Ravindra Jadejaला खेळण्याची परवानगी, जाणून घ्या का!
IPL 2020च्या बक्षीस रकमेतील कपात ही कॉस्ट-कटिंग नाही; BCCIनं सांगितलं खरं कारण!
विंडीजचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार Daren Sammyकडे पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपद
Web Title: Mitchell Starc to miss South Africa ODI to watch wife Alyssa Healy in ICC Women’s T20 World Cup final against India svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.