ठळक मुद्देपाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्याला ईसीबीचा हिरवा झेंडारविवारी संघ होणार इंग्लंड दौऱ्यावर रवाना
पाकिस्तान क्रिकेट मंडळ ( पीसीबी) सध्या त्यांच्याकडून झालेल्या कोरोना चाचणीवरून चर्चेत आहे. इंग्लंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पीसीबीनं खेळाडूंची कोरोना चाचणी केली. त्यात 29 पैकी 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पीसीबीनं जाहीर केलं. पण, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मोहम्मद हाफिजनं खासगी केंद्रात पुन्हा चाचणी केली आणि तेथे त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे पीसीबी तोंडावर आपटले. हाफिजच्या बंडानंतर पीसीबीनं पुन्हा खेळाडूंची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात पीसीबीकडून हाफिजचा पुन्हा कोरोना रिपोर्ट काढण्यात आला आणि त्यात तो पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.
पाकिस्तान क्रिकेट संघ तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी 28 जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. तत्पूर्वी त्या सर्वांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह अ सल्याचे समोर आले. आता पीसीबी त्यांची पुन्हा चाचणी करणार असून शनिवारी त्याचा अहवाल जाहीर करणार आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शौकत खनूम मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये हाफिजच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी केली गेली आणि तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.
हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंनंतर फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ''ही विचित्र परिस्थिती पीसीबीसमोर उभी राहीली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 खेळाडूंची पुन्हा चाचणी केली गेली आहे आणि त्यात काय समोर येते, हे पाहणे उत्सुकतेचं आहे,''असे सूत्रांनी सांगितले.
पीसीबीनं जाहीर केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी मोहम्मद हाफिजनं पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं त्यानं सोशल मीडियावरून जाहीर केले. त्यानं लिहिलं की,''पीसीबीच्या अहवालानंतर मी स्वतःच्या समाधानासाठी खासगी केंद्रात चाचणी केली. माझ्या कुटुंबीयांचीही चाचणी मी करून घेतली आणि त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.''
Web Title: Mohammad Hafeez ‘Covid-19 positive’ again as per PCB facilitated re-test - Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.