रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यातून दमदार कमबॅक करणारा मोहम्मद शमी आता शॉर्ट फॉर्मेटमधील क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झालाय. शनिवारी २३ नोव्हेंबरपासून रंगणाऱ्या सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेसाठी त्याची बंगाल संघात निवड करण्यात आली आहे. त्याची निवड तो टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो आणखी एक पायरी पुढे सरकतानाचे चित्र निर्माण करणारी आहे. यातली आतली गोष्ट ही की, बीसीसीआनं त्याच्या फिटनेस टेस्टसाठी टेस्ट केलेला हा आणखी एक पेपरच आहे.
मोहम्मद शमीसमोर आणखी एक 'कसोटी'
रणजी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर बॉर्डर गावसकर स्पर्धेसाठी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे तिकीट मिळणार का? हा प्रश्न चर्चेत आला होता. पण पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय त्याच्यासंदर्भात कोणतीही जोखीम घेणार नाही. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी झालेली निवड ही शमीसाठी फिटनेसची आणखी एक कसोटी असेल.
वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्यावर अगदी झोकात केलं कमबॅक
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर जवळपास वर्षभर त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे. मध्य प्रदेश विरुद्धच्या रणजी सामन्यातून बंगाल संघाकडून त्याने अगदी झोकात कमबॅक केले. या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या. याशिवाय बॅटिंगचीही खास झलक दाखवली होती. रेड बॉल क्रिकेटनंतर आता शमी टी-२० स्पर्धेत कशी कामगिरी करतोय ते पाहणे महत्त्वाचे असेल.
फिटनेस क्षमतेची चाचपणी
मोठ्या ब्रेकनंतर क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करणं ही सोपी गोष्ट नसते. त्यात गोलंदाजासाठी हा टास्क आणखी कठीण असतो. बीसीसीआय मेडिकल टीम आणि निवड समिती शमीच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत एकापेक्षा अनेक सामने खेळल्यानंतर त्याचा फिटनेस स्तर कसा आहे, यावरुन राष्ट्रीय संघात कमबॅक करण्यासाठी त्याला किती वेळ लागणार याचा निर्णय घेतला जाणार आहे. बीसीसीआयची ही भूमिका सध्याच्या घडीला शमीच्या नावाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विचार होणार नाही, हे स्पष्ट करणारी आहे.
Web Title: Mohammed Shami selected in Bengal squad for Syed Mushtaq Ali Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.