गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून जवळपास 8 महिने लांब आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर धोनीचं भवितव्य अवलंबून आहे. पण, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल होईल याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. त्यासोबत धोनीच्या पुनरागमनाच्या आशाही मावळल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार धोनीनं निवृत्तीचा निर्णय पक्का केला असून लवकरच त्याबाबत घोषणा करेल.
India Vs Corona: 10 श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी 'या' सहा जणांनी अजूनही दाखवलेली नाही मनाची श्रीमंती
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
सूत्रांनी सांगितले की,''निवृत्तीबाबत धोनीनं अजूनपर्यंत बीसीसीआयशी चर्चा केलेली नाही. पण, जवळच्या मित्रांना त्यानं त्याचा निर्णय सांगितला आहे. योग्य वेळ येईल, तेव्हा तो याबाबत घोषणा करेल. आयपीएलमध्ये तो त्याच्या फॉर्माची चाचपणी करायची होती, अन्यथा त्यानं बरीच पूर्वी निवृत्ती जाहीर केली असती.''
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप उंचावला. 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला तो धोनीच्या नेतृत्वाखालीच आणि त्यानंतर 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरही टीम इंडियानं नाव कोरलं. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा धोनी जगातला एकमेव कर्णधार आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Salute : आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी
Video : कोरोना व्हायरसमुळे भयभीत आहात? DJ Bravoचं नवं प्रेरणादायी गाणं ऐका
Video : क्वारंटाईनमध्ये विराट-अनुष्का काय करतायत ते पाहा!
Corona Virus : 21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू
Web Title: MS Dhoni All Set To Retire From Cricket: Report svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.