अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. जुलै 2019 पासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होती. शनिवारी धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. भारताला अनेक अविश्वसनीय विजय मिळवून देणाऱ्या धोनीनं मैदानाबाहेर घेतलेली निवृत्ती अनेकांना पटलेली नाही. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्याला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचे संकेत दिलेच होते. त्यामुळे धोनीनं त्यांना कळवण्याआधी आपल्या चाहत्यांना याबाबत थेट कळवणे पसंत केलं. धोनीच्या निवृत्तीनंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या खास शैलित ट्विट केलं आणि ते तुफान व्हायरल झालं. MS Dhoni Retirement
''माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा,''धोनीचं ही पोस्ट बरीच बोलकी आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. MS Dhoni Retirement
सेहवागनं ट्विट केलं की,''महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू मिळणे, अशक्य आहे. ना कोई है, ना कोई था, ना कोई होगा, एमएस के जैसा. खेळाडू येतील आणि जातील, परंतु तुझ्यासारखा शांत माणून होणे नाही. त्याची लोकांना एवढा जवळचा वाटायचा की जणू तो त्यांच्या कुटूंबातील सदस्य आहे. ओम फिनिशाय नमः''
''क्रिकेट चाहत्यांना त्याच्यापासून कधीच स्वातंत्र्य नको हवं होतं. तुझ्यासोबतच्या अगणित आठवणींसाठी धन्यवाद आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा,''असेही वीरू म्हणाला.
लोकांनी तुझं यश पाहिलं, मी तुझ्यातला माणूस पाहिला आहे, विराट कोहलीचं भावनिक ट्विट
महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पण अन् निवृत्तीनं जुळवून आणला अजब योगायोग!
महेंद्र सिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
मै पल दो पल का शायर हूँ...! निवृत्ती जाहीर करताना MS Dhoniनं दिला 'खास' संदेश!
'कॅप्टन कूल' धोनीनं अखेर 'टफ' कॉल घेतला; संघाचं हित समजून निवृत्ती स्वीकारली
अशी कामगिरी करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार
महेंद्रसिंग धोनीचे 'हे' दहा विक्रम मोडणे अशक्य!
महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाच्या नावावर नोंदवला होता अजरामर विक्रम!
Web Title: MS Dhoni Retirement: To have a player like him,Mission Impossible, Om Finishaya Namah, Virender sehwag tweet goes viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.