MS Dhoni Twitter Trend: सोशल मीडियाच्या जगात काहीतरी घडतं आणि एखादी घटना किंवा व्यक्ती ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये येते हे आपण सामान्यत: पाहत आलो आहोत. पण ट्विटरवर आज एक वेगळीच धमाल सुरूय. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये आहे. पण तो का ट्रेंड होतोय हे कुणालच कळालं नाही. ट्विटरकर भरभरुन MS Dhoni हॅशटॅग वापरुन ट्विट करतायत. ते म्हणतात ना "बस नाम ही काफी है!" त्यातलाच काहीसा हा प्रकार म्हणावा लागेल. (MS Dhoni trending on Twitter)
नेमकं काय घडलं?
ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये MS Dhoni हे नाव सध्या अव्वल स्थानावर आहे. पण आज ना धोनीचा वाढदिवस ना आजच्या दिवशी धोनीनं काही पराक्रम केला. तरीही त्याच्या नावावं युझर्स ट्विट करत आहेत. धोनीचे चाहते देखील याचं कौतुक करत आहेत. महेंद्रसिंग धोनीला ट्विटवर ट्रेंडमध्ये येण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही त्याचं फक्त नाव पुरेसं आहे, अशा आशयाचं ट्विट अनेक चाहते करत आहेत. तर काहींनी धोनीच्या आठवणींनाही उजाळा देण्यास सुरुवात केली आहे.
धोनीचं महत्वं किती आहे आणि त्यानं भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक क्रिकेट चाहते ट्विटवर करत आहेत. काहींनी तर धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांचे काही व्हिडिओ देखील ट्विट केले आहेत. यात धोनीचा 'कॅप्टन कूल' अंदाज दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, आज दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याचा आज वाढदिवस आहे. पण डिव्हिलियर्सच्या वाढदिवसाचं ट्विट करतानाही युझर्स डिव्हिलियर्ससोबत धोनीचेही फोटो ट्विट करत आहेत. अनेकांनी धोनी आणि डीव्हिलियर्स यांच्यातील साम्य देखील पटवून देणारी ट्विट केली आहेत.
IPL 2021 साठीचा लिलाव उद्या (IPL 2021 Auction)
आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठीच्या खेळाडूंची लिलाव प्रक्रिया उद्या होणार आहे. यानिमित्तानंही चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या संघात नेमकं कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण यंदा सर्वाधिक चेन्नईकडून संघातील खेळाडूंना करारमुक्त करण्यात आलं होतं. त्यामुळे चेन्नईच्या संघात यंदा नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत.
Web Title: ms dhoni in twitter top trends for no reason at all
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.