भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची वाढलेली सफेद दाढी पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुलगी झिवासोबत खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात धोनीचा लूक पाहून नेटिझन्सचं टेंशन वाढलं होतं. धोनीची क्रिकेट कारकीर्द संपली अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यामुळे धोनीचं टीम इंडियामध्ये पुनरागमन आता काही होत नाही, असाही अंदाज बांधला जात आहे. पण, धोनीच्या त्या व्हायरल फोटोवर त्याच्या आईची मात्र वेगळीच प्रतिक्रिया आहे. माझा मुलगा एवढाही वयस्कर झालेला नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
बांगलादेश क्रिकेट न्यूजशी बोलताना धोनीच्या आईनं सांगितलं की,''माझा मुलगा एवढाही वयस्कर झालेला नाही. प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा लहानच असतो.'' ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत धोनी खेळेल का, या प्रश्नावर त्यांनी चांगलं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,''तो खेळेल की नाही, हे मी खात्रीनं सांगू शकत नाही. प्रथम जगावर आलेलं हे संकट सरून जाऊदे. राहिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळण्याचा प्रश्न, याचं उत्तर धोनीच देऊ शकतो.''
जुलै 2019नंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तो टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी आशा होती. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरच अनिश्चिततेचं सावट आलं आहे.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!
85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान
Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!
वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला
महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा
2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य!
Web Title: MS Dhoni's Mother Likes His New Look, Says Her Son Is Not That Old svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.