Prithvi Shaw : पृथ्वी शॉ फॉर्मात; ७९ चेंडूंत शतक, १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी, विराट कोहलीशी बरोबरी

Prithvi Shaw scored hundred, Vijay Hazare Semi-Final पृथ्वीनं या पर्वात चार शतकं झळकावून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:08 AM2021-03-11T11:08:27+5:302021-03-11T11:12:31+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Captain Prithvi Shaw scored hundred from just 79 balls including 12 fours and 3 sixes against Karnataka in Vijay Hazare Semi-Final | Prithvi Shaw : पृथ्वी शॉ फॉर्मात; ७९ चेंडूंत शतक, १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी, विराट कोहलीशी बरोबरी

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ फॉर्मात; ७९ चेंडूंत शतक, १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी, विराट कोहलीशी बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपृथ्वीचे लिस्ट ए क्रिकेटमधील आठवे शतक आहेमहेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला

मुंबई संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ यानं ( Mumbai Captain Prithvi Shaw) विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली आहे. कर्नाटकविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वीनं आणखी एक शतक झळकावलं. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला यशस्वी जैस्वाल ( ६) च्या रुपानं धक्का बसला. पण, पृथ्वी फॉर्मात दिसला. त्यानं ७९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. विजय हजारे ट्रॉफीतील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्यानं यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या देवदत्त पडीक्कल ( ६७३ धावा) यालाही मागे टाकले. पृथ्वीच फटकेबाजी अजूनही सुरू आहे आणि मुंबईनं २७ षटकांत २ बाद १५३ धावा केल्या आहेत. Video : विचित्र पद्धतीनं बाद झाला श्रीलंकेचा फलंदाज; वेस्ट इंडिजचा संघ अन् कारयन पोलार्ड आरोपीच्या पिंजऱ्यात

पृथ्वीनं या पर्वात चार शतकं झळकावून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटनं २००८-०९च्या विजय हजार ट्रॉफी मोसमात चार शतकं, तर देवदत्तनं यंदाच्या मोसमात चार शतकं झळकावली आहेत.


पृथ्वीचे लिस्ट ए क्रिकेटमधील आठवे शतक आहे. विजय हजारे ट्रॉफीत २०२१ त्यानं आतापर्यंत १०५*, ३४, २२७*, ३६, २, १८५* आणि १००* ( अजून खेळतोय) अशी कामगिरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१स्पर्धेतील पृथ्वी शॉ याचे चौथे शतक आहे. त्यानं दिल्ली विरुद्ध २१२ धावांचा पाठलाग करताना ८९ चेंडूंत नाबाद १०५ धावा केल्या होत्या. पुद्दुचेरीविरुद्ध १५२ चेंडूंत नाबाद २२७ धावा आणि उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रविरुद्ध २८५ धावांचा पाठलाग करताना १२३ चेंडूंत नाबाद १८५ धावा केल्या.   IPL 2021ला सुरूवात होण्यापूर्वीच स्फोटक फलंदाजानं सोडली RCBची साथ, विराट कोहलीच्या संघानं घेतली न्यूझीलंडची मदत 

सौराष्ट्रविरुद्धची खेळी अन् मोडला धोनी व विराटचा विक्रम 
पृथ्वीच्या नाबाद १८५ धावांच्या खेळीनं महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांचा विक्रम मोडला, लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करतानाही ही भारतीय खेळाडूची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीनं २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ आणि विराट कोहलीनं २०१२मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रमही पृथ्वीच्या नावावर आहे. त्यानं या मोसमात पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद २२७ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसन २१२*, यशस्वी जैस्वाल २०३, कर्ण कौशल २०२, वेंकटेश अय्यर १९८, रविकुमार समर्थ १९२, अजिंक्य रहाणे १८७ आणि पृथ्वी शॉ १८५* असा क्रमांक येतो. रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं! 

Web Title: Mumbai Captain Prithvi Shaw scored hundred from just 79 balls including 12 fours and 3 sixes against Karnataka in Vijay Hazare Semi-Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.