Join us  

Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

mumbai vs rest of india : मंगळवारपासून इराणी चषकात मुंबई विरुद्ध शेष भारत अशी लढत होत आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 12:02 PM

Open in App

mumbai vs rest of india live score | लखनौ : खराब सुरुवातीनंतर मुंबईच्या संघाने शानदार पुनरागमन करत शेष भारतविरुद्ध चमक दाखवली. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर सर्फराज खानने शतक झळकावले. त्याने १४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इराणी चषक २०२४ मध्ये मंगळवारपासून मुंबई आणि शेष भारत यांच्यात लढत सुरू झाली आहे. शेष भारतचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडत आहे.

प्रथम गोलंदाजी करताना शेष भारतने चांगली पकड बनवली. पहिल्या सत्रापासून मुकेश कुमारने मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. त्याने पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे आणि हार्दिक तमोरे या त्रिकुटाला तंबूत पाठवण्याचे काम केले. मग अय्यर (५७) आणि रहाने या जोडीने १०२ धावांची चांगली भागीदारी नोंदवत मुंबईचा डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ६८ षटकांत ४ बाद २३७ धावा केल्या होत्या. अजिंक्य रहाणे त्याच्या शतकाला थोडक्यात मुकला अन् ९७ धावांवर असताना यश दयालचा शिकार झाला. शेष भारतकडून आतापर्यंत मुकेश कुमारने सर्वाधिक चार तर यश दयालने दोन बळी घेतले. 

मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तमोरे, श्रेयस अय्यर, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर, जुनैद खान, सर्फराज खान, शम्स मुलानी, तनुष कोटियन.

शेष भारतचा संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल. 

टॅग्स :मुंबईसर्फराज खानअजिंक्य रहाणेऋतुराज गायकवाड