शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं

मुस्कान वासवा (Muskan Waswa) या तरुणीची एक प्रेरणादायी कहाणी.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:12 PM2021-02-24T16:12:53+5:302021-02-24T16:13:47+5:30

whatsapp join usJoin us
muskan waswa father turned farm into ground for daughter | शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं

शेतकऱ्याचं मुलीचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न!, वडिलांनी थेट शेताचं रुपांतर मैदानात केलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय महिला आज कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. क्रीडा क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंत आणि अगदी रेसलिंगमध्येही भारतीय महिलांनी नाव कमावलं आहे. स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. भारतीय महिला खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या पाठिंब्याचाही तितकाच मोलाचा वाटा राहिला आहे हे आपण पाहत आलो आहेत. (muskan waswa father turned farm into ground for daughter)

गुजरातच्या भरुचमधील मुस्कान वासवा (Muskan Waswa) या तरुणीची अशीच एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. मुस्कानचं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न आहे. त्यासाठी ती कठोर मेहनत देखील घेतेय. पण तिच्या शेतकरी वडिलांनी आपल्या मुलीसाठी केलेला त्याग सर्वांचं  लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. मुस्कानच्या वडिलांनी आपल्या मुलीला क्रिकेट खेळता यावं यासाठी चक्क आपल्या शेताचं रुपांतर क्रिकेट मैदानात केलंय. आनंदाचीबाब अशी की मुस्कानची नुकतीच गुजरातच्या सीनिअर क्रिकेट संघात निवड झालीय. मुस्कान तिच्या जिल्ह्यातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. तिनं आपल्या यशाचं सर्व श्रेय तिचे शेतकरी वडील चंद्रकांत वासवा यांना दिलं आहे. 

मुलीसाठी शेतीचं रुपांतर केलं क्रिकेट ग्राऊंड
गुजरातच्या झगडिया येथील बलेश्वर गावची रहिवाशी असलेल्या मुस्कानला लहानपणापासूनच क्रिकेटपटू होण्याची इच्छा होती. आपल्या भावाला आणि वडिलांच्या क्रिकेटप्रेमाला पाहूनच क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाल्याचं मुस्कान सांगते. मुस्काननं जेव्हा आपली इच्छा वडिलांकडे व्यक्त केली तेव्हा चंद्रकांत वासवा यांनी आपल्या मुलीला पाठिंबा द्यायचं ठरवलं. आपल्या मुलीला सरावासाठी जास्त लांब जावं लागू नये घरीच सराव करता यावा यासाठी चंद्रकांत वासवा यांनी आपल्या शेतीचं रुपांतर क्रिकेट ग्राऊंडमध्ये केलं. या मैदानातूनच मुस्कानच्या क्रिकेटची सुरुवात झाली. पुढे जाऊन तिची भरुच जिल्ह्याच्या आणि अंडर-१९ क्रिकेट संघात निवड देखील झाली. एक वेगवान गोलंदाज म्हणून मुस्काननं जबरदास्त कामगिरी केली. 

Web Title: muskan waswa father turned farm into ground for daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.