नवी दिल्ली : युवराज सिंगने सांगितले की, २००७ टी-२० विश्वकप स्पर्धेत ज्यावेळी स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा षटकार ठोकले होते, त्यावेळी त्याच्या बॅटबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर मॅच रेफरीने त्याच्या बॅटची तपासणी केली होती.
एका वाहिनीला मुलाखत देताना युवराज म्हणाला, ‘त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक माझ्याकडे आले होते आणि त्यांनी माझ्या बॅटच्या मागे फायबर लागले आहे का आणि ते वैध आहे का, असा प्रश्न केला होता.’
युवराज पुढे म्हणाला, ‘एवढेच नाही तर अॅडम गिलख्रिस्टनेही मला विचारले की तुमच्या बॅट कोन तयार करते. त्यामुळे मॅच रेफरीने माझ्या बॅटची चाचणी घेतली आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास ती बॅट माझ्यासाठी विशेष होती. मी यापूर्वीच्या बॅटसह असा कधीच खेळलो नाही’युवराजने युवा प्रतिभेला संधी देण्यासाठी सौरव गांगुलीची प्रशंसा केली. युवराज म्हणाला, ‘दादा माझा आवडता कर्णधार होता. त्याने माझे बरेच समर्थन केले.’ (वृत्तसंस्था)
धोनीचा रैनाला होता पाठिंबा
युवराज सिंगच्या मते, महेंद्रसिंग धोनीने नेहमी सुरेश रैनाचे समर्थन केले. युवराजने सांगितले की, २०११ च्या विश्वकप स्पर्धेदरम्यान धोनीसाठी संघ निवड डोकदुखी ठरत होती. अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला माझ्यासह युसूफ पठाण व सुरेश रैना यांच्यापैकी दोघांची निवड करायची होती. तिन्ही खेळाडूंनी अंतिम संघात (पठाणला स्पर्धेदरम्यान अंतिम ११ खेळाडूतून वगळण्यात आले.) स्थान मिळवले आणि युवराजने भारताला जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवराज म्हणाला, ‘त्यावेळी युसूफ पठाणही चांगली कामगिरी करीत होता आणि माझी कामगिरीही चांगली होत होती आणि मी बळीही घेत होतो, पण त्यावेळी रैना फॉर्मात नव्हता. त्यावेळी भारतीय संघात डावखुरा फिरकीपटू नव्हता आणि मी बळी घेत असल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय नव्हता.’
Web Title: my bat was checked after hitting six sixes against england tells yuvraj singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.