नेपाळचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ललित भंडारी याचा रविवारी मोटार बाईकवरून जात असताना भीषण अपघात झाला. कांचनपूर येथे झालेल्या अपघातात 24 वर्षीय क्रिकेटपटूच्या मोटार बाईक्सची झलरी मार्केट नजिकच्या पूर्व-पश्चिम हायवेवर ट्रक्ससोबत धडक झाली. सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात झाला आणि जखमी अवस्थेत ललितला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
IPL 2020 साठी KKRनं अमेरिकेहून गोलंदाज मागवला; 140kphच्या वेगानं करतो मारा, Video
ललितचे नातेवाईक राम सिंग खत्री यांनी सांगितले की,''ललितच्या उजव्या खांद्याला आणि कंबरेला दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर ललित बेशुद्ध झाला होता आणि काहीतरी पुटपुटत होता. धनगढी रिसर्च हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.''
नेपाळ क्रिकेट असोसिएशननंही त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ललितच्या डोक्याला कोणतीही दुखापत झालेली नाही.''
ऑगस्ट 2018मध्ये त्यानं नेपाळच्या वन डे संघातून नेदरलँड्सविरुद्ध पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्यानं दोन विकेट्स घेतल्या होता. तीन लिस्ट A क्रिकेटमध्ये आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं नेपाळचे प्रतिनिधित्व केले. मेरिलेबॉन क्रिकेट क्लबविरुद्ध खेळताना त्याला महेला जयवर्धने व जॉनथन ट्रॉट यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. नेपाळ पोलीस क्लबकडूनही तो खेळतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी?
IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो
IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ
IPL 2020आधी विराट कोहलीनं स्वतःला लिहिलं भावनिक पत्र; हा Video तुम्हालाही इमोशनल करेल
आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video
Web Title: Nepal international Lalit Bhandari hospitalised after bike accident
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.