ठळक मुद्देटीम इंडिया ४३० गुण व ७१.७च्या टक्केवारीनं अव्वल स्थानावर न्यूझीलंड ४२० गुणांसह ७०.० च्या टक्केवारीनं दुसऱ्या क्रमांकावर तरीही न्यूझीलंडनं अंतिम फेरीत कसा प्रवेश केला?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिका दौरा स्थगित केला. ऑस्ट्रेलियाचा संघ तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार होता, परंतु तेथील कोरोना परिस्थिती पाहता त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाच्या या निर्णयाचा न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला अन् त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship ) अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दुसऱ्या फायनलिस्टसाठी टीम इंडिया आणि इंग्लंड हे संघ शर्यतीत आहेत. IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद!
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया ४३० गुण व ७१.७च्या टक्केवारीनं अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड ४२० गुणांसह ७०.० च्या टक्केवारीनं दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही न्यूझीलंडनं अंतिम फेरीत कसा प्रवेश केला, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ होते, परंतु ऑस्ट्रेलियानं आफ्रिका दौरा रद्द केल्यानं ते या शर्यतीतून बाद झाले. त्याचा फायदा न्यूझीलंडला झाला. आता भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England) कसोटी मालिकेतून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. ICCच्या विशेष पुरस्काराच्या शर्यतीतून आर अश्विनसह भारताचे चार शिलेदार बाद; 'या' तीन खेळाडूंमध्ये चुरस
टीम इंडियाला काय करावं लागेल ? ( For India to qualify for WTC final)
भारतीय संघाचे पारडे जड असले तरी त्यांना इंग्लंड सहजासहजी विजय मिळवून देणार नाही. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला ४-०, ३-०, ३-१, २-० किंवा २-१ असा निकाल लावावा लागेल. तरच ते अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकतात. दुसरीकडे इंग्लंडला लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला ४-०, ३-० किंवा ३-१ अशा फरकानं नमवावं लागेल. Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजे काय ?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची दोन वर्षांपूर्वी घोषणा केली. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार होते. परंतु कोरोनामुळे मागचं वर्ष वाया गेलं. गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवला जाईल.
1 ऑगस्ट 2019 पासून या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेनुसार अव्वल 9 संघ पुढील दोन वर्षांत होम-अवेय अशा प्रत्येकी तीन-तीन कसोटी मालिका खेळणार होते. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईल आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल. प्रत्येक मालिकेसाठी 120 गुण देण्यात येणार आहेत. जितक्या सामन्यांची मालिका त्यामुसार 120 गुणांची विभागणी प्रत्येक सामन्यासाठी होईल. ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo
Web Title: New Zealand becomes the first Team to qualify into WTC final, India can join them if they beat England 2-0
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.