NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाची हाराकिरी; उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी, न्यूझीलंडलाही एक धक्का

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : टीम साऊदी आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांनी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 08:04 AM2020-02-22T08:04:58+5:302020-02-22T08:05:33+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand vs India 1st Test : India lost five wickets for just 43 runs; India 165 all out | NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाची हाराकिरी; उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी, न्यूझीलंडलाही एक धक्का

NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाची हाराकिरी; उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी, न्यूझीलंडलाही एक धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी : टीम साऊदी आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांनी टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवावा लागला आणि त्यावेळी टीम इंडियाचे 5 शिलेदार 122 धावांवर माघारी परतले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, तेव्हा अजिंक्य रहाणेवर भिस्त होती. पण, साऊदीनं टीम इंडियाच्या शिलेदारांना हाराकिरी पत्करण्यास भाग पाडले. भारताचा उर्वरित निम्मा संघ 43 धावांत माघारी परतला. न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पहिला डाव 165 धावांत गुंडाळला आणि प्रत्युत्तरात ड्रींक्स ब्रेकपर्यंत 1 बाद 63 धावा केल्या आहेत.

भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करून न्यूझीलंडनं डाव खेळला. भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी करून किवींना डाव साध्य करण्यास जणू हातभार लावला. पृथ्वी शॉ ( 16), मयांक अग्रवाल ( 34), चेतेश्वर पुजारा ( 11), कर्णधार विराट कोहली ( 2) आणि हनुमा विहारी ( 7) हे आघाडीचे पाच फलंदाज झटपट माघारी परतले. उप कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मदार होती, परंतु दुसऱ्या दिवशी त्यानेही निराश केले. बाद होण्यापूर्वी रहाणेनं चुकीचा कॉल दिल्यानं रिषभ पंत ( 19) धावबाद झाला. साऊदीनं रहाणेला बाद केले. रहाणेनं 138 चेंडू खेळून 46 धावा केल्या.


पंत धावबाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर साऊदीनं अप्रतिम यॉर्कर टाकून आर अश्विनचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमीनं 20 चेंडूंत 21 धावा करून टीम इंडियाच्या धावसंख्येत भर घातली. साऊदीनं 49 धावांत 4, तर जेमिसननं 39 धावांत 4 फलंदाज बाद केले. भारताचा पहिला डाव 68.1 षटकांत 165 धावांवर गडगडला. न्यूझीलंडच्या सलामीवीर टॉम लॅथमला माघारी पाठवून इशांत शर्मानं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. पण, केन विल्यम्सन आणि टॉम ब्लंडल यांनी डाव सावरला. 

Web Title: New Zealand vs India 1st Test : India lost five wickets for just 43 runs; India 165 all out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.